Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार?

U19 World Cup : फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या  ताकदीने उतरणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाला नमवत अंतिम फेरीत धडक मारण्यास टीम इंडिया उत्सुक आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 02, 2022 | 09:46 AM
उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार?
Follow Us
Close
Follow Us:

India vs Australia Semifinal Under 19 World Cup 2022: १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत (U19 World Cup) भारतीय संघाने कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही धडाकेबाज कामगिरी केली आहे. टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या  ताकदीने उतरणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाला नमवत अंतिम फेरीत धडक मारण्यास टीम इंडिया उत्सुक आहे.

भारतीय संघ पहिल्या सामन्यानंतरच कोरोनाच्या विळख्यात आला होता. कर्णधार यश धुलसह संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी हे सर्व खेळाडू बरे झाले. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक मोहिमेत टीम इंडियासमोर संकटे आली होती. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.

डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने गतविजेत्या बांगलादेशचे पाच गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम फेरीतील शेवटच्या पराभवाचा बदला घेतला. टीम इंडियाने साखळी गटातील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर मात करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे.

टीम इंडियाचा आत्मविश्वासात वाढ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे परिणाम टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेवरही झाला होता. कोरोनाच्या महासाथीमुळे मागील दोन वर्षात कोणतेही राष्ट्रीय शिबीर अथवा इतर सपर्धांचे सामने झाले नाहीत. विश्वचषक सुरू होण्याआधी टीम इंडियाने आशिया चषकात सहभाग घेतला होता. टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे

भारतीय संघाचा कर्णधार यश धुल, शेख रशीद, हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, राज बावा यांच्या खांद्यावर फलंदाजीची भिस्त असणार. तर, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर, फिरकीपटू विकी ओस्तवाल, कौशल तांबे यांना प्रभावी मारा करावा लागणार आहे.

भारताने गतविजेत्या बांगलादेशचे पाच गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम फेरीतील शेवटच्या पराभवाचा बदला घेतला. गेल्या स्पर्धेत भारताला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दोन वेळेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, भारताने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली होती.

आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने

भारत सेमीफायनलमध्ये आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व दिसून आले आहे. नॉकनाउट सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला. टीम इंडियाने 2012 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तर, 2000 मध्ये पार पडलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत बाजी मारली.

सामन्याची वेळ?

भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6.30 वाजता उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा उपांत्य फेरीचा सामना पाहता येऊ शकतो.

Web Title: India vs australia semifinal under 19 world cup 2022 sport news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 09:41 AM

Topics:  

  • Cricket World Cup
  • ICC U19 World Cup
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…
1

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका
2

T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.