Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Bangladesh Match Live Score: भारताचा आशिया कप 2025 च्या ‘Final’ मध्ये दिमाखात प्रवेश, बांगलादेशला लोळवले

बांगलादेशच्या सैफ वगळता इतर कोणीही कमाल करू न शकल्याने भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आता श्रीलंका बाहेर गेली आहे. आता कोणता संघ समोर येईल पहावे लागेल

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 24, 2025 | 11:32 PM
भारताचा थेट अंतिम फेरीत प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारताचा थेट अंतिम फेरीत प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध बांगलादेश 
  • सुपर – ४ चा थरार 
  • भारताचा फायनलमध्ये प्रवेश 

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात भारताकडून मिळालेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली झुंज दिली. मात्र हा सामना त्यांच्या हातातून निसटला आणि भारताने फायनलमध्ये प्रवेश केला. बुमराहने तन्झिद हसनला बाद करत पहिली विकेट काढली होती तर कुलदीप यादवने परवेझ हुसेन इमॉनला बाद केले आणि बांगलादेशला दुसरा धक्का बसला.

केवळ एका बाजूने सैफने लढा दिला. मात्र बांगलादेशच्या खेळाडूंची अन्य फळी एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतली आणि भारताने या सामन्यावर विजय मिळवला. या सामन्यात भारताची फिल्डिंग मात्र वाईट झाली, कारण अनेक कॅच सुटले अन्यथा बांगलादेशला काही धावांमध्येच भारत गुंडाळू शकला असता. 

अभिषेक शर्माची झंझावाती खेळी

त्याआधी, भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. अभिषेक शर्मा वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशा केली. पॉवरप्लेमध्ये भारताने ७२ धावा केल्या होत्या. भारत २२०-२३० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु बांगलादेशने नियमित अंतराने विकेट्स घेत धावगती रोखली.

भारताकडून अभिषेकने ३७ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह ७५ धावा केल्या. हार्दिक पंड्यानेही २९ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. कर्णधार सूर्याने ५, शिवम दुबेने २ आणि तिलक वर्मा यांनी ५ धावा केल्या. अक्षर पटेल १५ चेंडूत १० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने ३ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले.

IND VS BAN : अभिषेक शर्माच्या वादळानंतरही भारताचे बांगलादेशसमोर 169 धावांचे लक्ष्य! रिशाद हुसेन चमकला

बांगलादेशाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र १६८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी जीवाची बाजी लावली. इतकंच नाही तर भारताच्या खराब फिल्डिंगमुळे त्यांना कितीतरी वेळा संधीदेखील मिळाली. पण तरीही बांगलादेश हा सामना जिंकू शकला नाही. बांगलादेशने या सामन्यात चार बदल केले, तर भारताने कोणताही बदल केला नव्हता. जर टीम इंडियाने आज बांगलादेशला हरवले असून आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत आणि श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे. 

सैफ हसनने अर्धशतक केले. त्याने फक्त ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशसाठी हा एक महत्त्वाचा सामना होता आणि सैफने अपवादात्मकपणे चांगली फलंदाजी केली. त्याने एका टोकापासून धावसंख्या पुढे नेत ठेवली आणि षटकार मारून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र दुसऱ्या बाजूला एक एक खेळाडू आऊट होत गेला. कुलदीपने १६ रन्स देऊन ३ विकेट्स काढल्या, मात्र त्याची हॅटट्रिक हुकली. 

IND VS BAN : भारताचा विजयी रथ रोखणार? बांगलादेशचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय…

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 

भारताची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

बांग्लादेशची प्लेइंग इलेव्हन: सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, झाकेर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान.

Web Title: India vs bangladesh match live score updates in asia cup 2025 t20 super 4 ind vs ban india won in dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 11:32 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia cup 2025
  • IND VS BAN

संबंधित बातम्या

IND VS BAN : अभिषेक शर्माच्या वादळानंतरही भारताचे बांगलादेशसमोर 169 धावांचे लक्ष्य! रिशाद हुसेन चमकला 
1

IND VS BAN : अभिषेक शर्माच्या वादळानंतरही भारताचे बांगलादेशसमोर 169 धावांचे लक्ष्य! रिशाद हुसेन चमकला 

Shaheen Afridi PC :- शाहिन आफ्रिदीचा टीम Indiaला ‘चॅलेंज’; म्हणाला, ‘त्यांच्याशी अंतिम सामन्यातच भेटू!
2

Shaheen Afridi PC :- शाहिन आफ्रिदीचा टीम Indiaला ‘चॅलेंज’; म्हणाला, ‘त्यांच्याशी अंतिम सामन्यातच भेटू!

IND VS BAN : भारताचा विजयी रथ रोखणार? बांगलादेशचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय…
3

IND VS BAN : भारताचा विजयी रथ रोखणार? बांगलादेशचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय…

अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का? 
4

अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.