सूर्यकुमार यादव आणि झाकीर अली(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धेतील चौथा सुपर ४ सामना आज भारत आणि बांगलादेश या दोन संघात खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघ आपापला पहिला सुपर ४ सामना जिंकून आले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील अंतिम फेरीचे लक्ष्य गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचे असणार आहे. यावेळी बांगलादेश संघाची धुरा झाकीर अली वाहणार आहे. लिटन दास य सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
हेही वाचा : Ashes 2025 मालिकेसाठी इंग्लंड संघ घोषित जाहीर! ‘या’ घातक गोलंदाजाचे पुनरागमन; वाचा कुणाची लागली वर्णी…
भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताने गट टप्प्यात यूएई, पाकिस्तान आणि ओमानला पराभूत केले आहे तर सुपर ४ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा या स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभव केला आहे. सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १७२ धावा केल्या होत्या, प्रतिउत्तरातत भारताने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोन सलामीवीर जोडीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरवार हे लक्ष्य सहज पूर्ण केले होते. अभिषेक शर्माने ७४ तर शुभमन गिलने ४७ धावा केल्या होत्या.
तसेच बांगलादेशने या स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, त्यांना श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशने दमदार पुनरागमन करत गट टप्प्यात अफगाणिस्तान आणि सुपर ४ सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला होता.
टी-२० स्वरूपातील आशिया कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश आतापर्यंत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारत बंगालदेशवर वर्चस्व रखेल असे बोलले जात आहे. तरी, मागील दोन्ही सामने जिंकणाऱ्या बंगालदेशचा देखील आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असणार आहे. त्यामुळे भारताला या संघापासून थोडे सावधान राहावे लागणार कारण हा संघ धक्का देण्यात पटाईत याहे.
हेही वाचा : अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का?
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
बांगलादेश संघ : परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदॉय, झाकेर अली (कर्णधार), शमीम हुसेन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, मोहम्मद सैफुद्दीन, तन्झीम हसन आणि तनजीम हसन.