भारत वि बांगलादेश(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धेत आज सुपर ४ सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने सलामीवीर अभिषेक शर्माच्या तडाखेबाज ७५ धावांच्या जोरावर ६ विकेट्स गमावून १६८ धावा उभ्या केल्या आहेत. बांगलादेशला हा सुपर ४ सामना जिंकायचा असेल तर १६९ धावा कराव्या लागणार आहे. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ७५ धावा काढल्या. तर बांगलादेशकडून रिशाद हुसेनने २ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा : अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का?
भारतीय डाव
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर ४ सामन्यात बांगलादेशचा कर्णधार झाकीर अली ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. सुरुवातीच्या ३ ओव्हर असे वाटत होते की झाकीर अलीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य आहे. कारण पहिल्या ३ ओव्हरमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. परंतु, ३ ओव्हर नंतर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल जोडीने तूफान फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी ७७ धावा जोडल्या. त्यानंतर शुभमन गिल २९ धावा करून माघारी परतला. त्याने १९ चेंडूत २९ धावा केल्या. त्यात त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. गिलला रिशाद हुसेनने बाद केले.
शुभमन गिल गेल्यावर शिवम दूबे फलंदाजीसाठी आला. परंतु, तो २ धावा करून झटपट बाद झाला. त्याला रिशाद हुसेनने माघारी पाठवले. तोपर्यंत अभिषेक शर्मा चांगली फटकेबाजी करत होता. परंतु, धावा घेण्याच्या नादात तो धाव बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यानंतर सूर्यकुमार यादव ५ धावा, तिलक वर्मा ५, हार्दिक पंड्या ३८ धावा काढून बाद झाले तर अक्षर पटेल १० धावा कडून नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेने सर्वाधिक २ विकेट्स तर मुस्तफिजुर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
बांगलादेश संघ : परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदॉय, झाकेर अली (कर्णधार), शमीम हुसेन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, मोहम्मद सैफुद्दीन, तन्झीम हसन आणि तनजीम हसन.