फोटो सौजन्य - एक्स सोशल मीडिया
रोहित शर्माला नवा विक्रम नावावर करण्याची संधी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कमालीची करताना दिसत आहे. भारताच्या संघाने सुरु असलेल्या मालिकेमधील पहिले दोन सामने जिंकून मालिका नावावर केली आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लडविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यांमध्ये फेल झाला पण त्याने त्याची कसर दुसऱ्या सामन्यांमध्ये शतक ठोकून पूर्ण केली आहे.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९० चेंडूत ११९ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. या खेळीनंतर, चाहत्यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, या सामन्यात त्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जर रोहितने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात किमान १३ धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यात ११,००० धावा करणारा जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज बनेल.
२३ जून २००७ रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून, रोहितने २६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,९८७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११,००० धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने त्याच्या २३० व्या एकदिवसीय सामन्यातील २२२ व्या डावात ११००० धावांचा टप्पा ओलांडला.
विराट कोहली (भारत) – २२२ सामने
सचिन तेंडुलकर (भारत) – २७६ सामने
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया, आयसीसी) – २८६ सामने
सौरव गांगुली (भारत, आशिया) – २८८ सामने
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका, आयसीसी, आफ्रिका) – २९३ सामने
Rohit Sharma’s dominance continues! 🌟
In his last 20 international centuries, India have lost just ONE match – a testament to his brilliance and impact to the side 🔥🇮🇳#Cricket #India #RohitSharma #INDvENG pic.twitter.com/j1mdQCIOHg
— Sportskeeda (@Sportskeeda) February 11, 2025
रोहितने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले तर तो सचिन तेंडुलकर आणि कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. यानंतर विराट कोहली येतो. त्याने आतापर्यंत ५४४ सामन्यांमध्ये ८१ शतके झळकावली आहेत.
मागील काही मालिकांमध्ये त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खराब फॉर्ममध्ये होते त्यामुळे या दोघांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या आधी रोहित शर्माने दमदार शतक ठोकून कमबॅकचा इशारा विरोधी संघाला दिला आहे.