फोटो सौजन्य – Youtube
अंडर 19 भारत विरुद्ध इंग्लंड युवा संघांचा दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचे आत्तापर्यंत दोन दिवस खेळवण्यात आले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याचे आयोजन काउंटी मैदानावर करण्यात आले आहे. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने एक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिनी इंग्लंडच्या संघाला भारताच्या संघाने सर्व बाद केले आहे आणि ३०९ धावांवर रोखले आहे. दुसऱ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या.
भारताचे संघाने पहिले गोलंदाजी करताना नमन पुष्पक याने त्याची जादू दाखवली. त्याने संघासाठी 17 ओव्हर टाकला यामध्ये 76 धावा देत चार विकेट्स घेतले. नमन पुष्पक याने इंग्लंडचा कर्णधार आणि विकेटकीपर थॉमस रेव, रायफिये अल्बर्ट, जेम्स मिंटो, अलेक्स ग्रीन यांना बाहेरचा दाखवला. आदित्य रावत याने संघासाठी दोन विकेट्स घेतले. हेनिल पटेल याने संघाला एक विकेट मिळवून दिला. विहान मल्होत्रा येण्यास एक विकेट घेतला, त्याचबरोबर अंबरीश यांनी देखील संघाला दोन विकेट मिळवून दिला.
Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?
वैभव सूर्यवंशीने त्याच्या डावाची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. त्याने येताच चौकार आणि षटकार मारले. पण तो कदाचित विसरला असेल की हा एक कसोटी सामना आहे, जिथे संयमाने फलंदाजी करावी लागते. या डावातही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना त्याने आपली विकेट गमावली. पहिल्या कसोटी सामन्यातही वैभवला काही विशेष कामगिरी करता आली नाही. तिथे त्याने पहिल्या डावात १४ धावा आणि दुसऱ्या डावात ५६ धावा केल्या.
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर खूप चांगली फलंदाजी केली आहे. या दौऱ्यात त्याने आतापर्यंत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह ३२ षटकार मारले आहेत. युवा एकदिवसीय मालिकेत त्याने २९ षटकार मारले आहेत आणि आता त्याने कसोटी मालिकेत आतापर्यंत ३ षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत तीन डावांमध्ये फक्त ९० धावा केल्या आहेत. या मालिकेत त्याला आणखी एका डावात फलंदाजीची संधी मिळू शकते. तो तिथे कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
🇮🇳 The India U19 opening batters make their way out to the middle, with 14-year old IPL star Vaibhav Suryavanshi facing the first delivery! You can still purchase tickets to watch the final game between England U19’s & India U19’s! 🎟️ https://t.co/WjGNUwFduK pic.twitter.com/3zfXR59VJQ — Essex Cricket (@EssexCricket) July 21, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंड अंडर-१९ संघ प्रथम फलंदाजी करताना ३०९ धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात इंग्लंडकडून एकांश सिंगने शानदार शतक झळकावले. त्याने १५५ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. त्याच्याशिवाय थॉमस रेव्हने अर्धशतकी खेळी केली. त्याने ७९ चेंडूत ५९ धावा केल्या. जेम्स मिंटोने ४६ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत भारताकडून नमन पुष्पकने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याच्याशिवाय आरएस अम्ब्रीश आणि आदित्य रावत यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.