फोटो सौजन्य - सोशल मीडिया
India vs New Zealand Champions Trophy 2025 final match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी फायनलचा सामना ९ मार्च रोजी खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ जेतेपदासाठी शेवटच्या सामन्यात मैदानात उतरणार आहेत. चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, जिथे रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाईल. दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारत किवी संघाला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकू इच्छितो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघदुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यातदोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीत, विजेतेपदासाठी कठीण लढत अपेक्षित आहे.
Champions Trophy 2025 फायनलच्या सामन्यात बदल? वाचा IND vs NZ सामना दुबईमध्ये किती वाजता सुरू होणार
सामना सुरु व्हायला आता काही तास शिल्लक राहिले आहेत, त्याआधी चॅम्पियन ट्रॉफीसाठी हिंदी कॉमेंटेटर आणि इंग्लिश कॉमेंटेटर यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लिश कॉमेंटेटरच्या यादीमध्ये रवी शास्त्री, हर्षा भोगले, सायमन डौल, इयान स्मिथ, दिनेश कार्तिक, इयान बिशप, सुनील गावस्कर, आरोन फिंच आणि रमिझ राजा या नावांचा समावेश आहे तर हिंदी कॉमेंटेटर मध्ये नवज्योत सिंह सिंधू, आकाश चोप्रा, जतीन सप्रू, हरभजन सिंह, सुरेश रैना, अंबाती रायडू, संजय बांगर, अनंत त्यागी, वकार युनिस हे दिग्गज असणार आहेत.
INDIA VS NEW ZEALAND CT FINAL COMMENTATORS:
English – Shastri, Bhogle, Doull, Ian Smith, Karthik, Bishop, Gavaskar, Finch and Raja.
Hindi – Sidhu, Chopra, Sapru, Harbhajan, Raina, Rayudu, Bangar, Anant Tyagi and Waqar Younis. pic.twitter.com/BvE0MmldoG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2025
भारताने लीग टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांनी अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडला भारताविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.
२४ वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. याआधी २००० मध्ये, न्यूझीलंडने भारताला हरवून आयसीसी नॉकआउट ट्रॉफी जिंकली होती. हे न्यूझीलंडचे एकमेव आयसीसी जेतेपद आहे. त्याच वेळी, भारताने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल.