फोटो सौजन्य - Cricbuzz सोशल मीडिया
India vs New Zealand Champions trophy final : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. भारताचा संघाने चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेत एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला या स्पर्धेमध्ये एक सामना गमवावा लागला आहे. न्यूझीलंडच्या संघाला लीग सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने अंतिम सामन्यांमध्ये येणार आहेत आणि जेतेपदासाठी लढणार आहेत. भारताच्या संघाने २०११ मध्ये जेतेपद धोनीच्या नेतृत्वात जिंकले होते आता एवढ्या वर्षाचा दुष्काळ टीम इंडिया संपवू इच्छिते.
IML 2025 : ‘झुकेगा नाही साला’, Shane Watson च्या बॅटमधून स्पर्धेत तिसरे शतक, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करून न्यूझीलंडच्या संघाने फायनल गाठली आहे. अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली, त्यापैकी एक लाहोर स्टेडियम आणि दुसरे दुबई स्टेडियम होते. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचताच, आता स्पर्धेचा अंतिम सामना फक्त दुबईमध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता फायनलच्या सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? तर याचे उत्तर आहे नाही, असे काहीही घडले नाही आणि सामना नियोजित वेळेवर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक २ वाजता होईल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने याच वेळी खेळले गेले आहेत.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर मोफत पाहता येणार आहे.
PHIR EK BAAR 💙 🇮🇳
As India takes the field in the FINAL, the whole country stands behind them! Let’s bring it home! 🏆🇮#ChampionsTrophyOnJioStar FINAL 👉 #INDIA 🆚 #NewZealand | SUN, 9 MAR, 1:30 PM📺 LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2 & Sports18-1!
📱… pic.twitter.com/D9xs3NL9AS— Star Sports (@StarSportsIndia) March 7, 2025
२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, त्यानंतर २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. तथापि, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले.
आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने ६१ सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. याशिवाय, ७ सामने अनिर्णीत राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला.