फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची अपडेट : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावर आहेत, टीम इंडीयाचा संघ रोहित शर्माच्या निवृतीनंतर शुभमन गिलच्या हाती कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. टीम इंडीयाच्या संघाला इंग्लडविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत, त्यानंतर आता त्याचा परिणाम क्रिकेट मैदानावरही दिसून येईल असे मानले जात होते.
आशिया कप खेळवला जाणार आहे, ज्याचे यजमानपद भारताकडे आहे. आतापर्यंत आशिया कपबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते की यावेळी ही स्पर्धा होईल का, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर येतील का? आता आशिया कप २०२५ च्या तारखेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, त्यानुसार ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाऊ शकते.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आशिया कप २०२५ १० सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतो, ज्यासाठी एसीसीने तयारी सुरू केली आहे. यावेळी स्पर्धेत ६ संघ सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि यूएई यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, आशिया कप २०२५ चे सर्व सामने यूएईमध्ये खेळवले जातील.
ENG vs IND : कॅप्टन स्मृती मानधनाने केला कहर! ऐतिहासिक शतक, पहिल्यांदाच घडली ही आश्चर्यकारक गोष्ट
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे होते पण भारताच्या संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवण्यात आली, या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानच्या हातात होते आणि टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, त्यानंतर टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने यूएईमध्ये खेळले आणि जेतेपदही जिंकले.
🚨 ASIA CUP 2025 UPDATE. 🚨
– Asia Cup 2025 likely to start from 10th September with both India and Pakistan taking part. (Cricbuzz). pic.twitter.com/EARuncL092
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 28, 2025
जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि यूएई हे संघ २०२५ च्या आशिया कपमध्ये सहभागी होतील. तटस्थ ठिकाणी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या आयोजनाच्या शर्यतीत यूएई आघाडीवर आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की आशिया कप हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याबाबत काही चर्चा सुरू आहेत. भारत यजमान असला तरी, एसीसीने यापूर्वीच निर्णय घेतला होता की जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानची पाळी असेल तेव्हा त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील.