IND Vs SA Final: टीम इंडियाने जिंकला दुसरा U-19 'वर्ल्ड कप'; 9 विकेट्सनी उडवला 'चोकर्स'चा धुव्वा
Under-19 World Cup: भारताच्या महिला क्रिकेट अंडर 19 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 83 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केले.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆#TeamIndia 🇮🇳 are the ICC U19 Women’s T20 World Cup 2025 Champions 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/hkhiLzuLwj #SAvIND | #U19WorldCup pic.twitter.com/MuOEENNjx8
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2025
टीम इंडियाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मिडियाववर मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे. याधी 2023 मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाची उपकर्णधार सनिका चाळके हिने विजयी चौकार मारत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. दुसऱ्या विकेटसाठी भारताने 48 धावांची भागीदारी केली.
हेही वाचा: Ranji Trophy 2025 : विराट कोहली फ्लॉप पण दिल्लीच्या झोळीत विजय, रेल्वेला केलं पराभूत
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसामोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला केवळ 82 धावाच करता आल्या.
भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील चौथा सामना हा पुणे येथे पार पडला. पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर आजचा चौथा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा धावांनी पराभव केला. तसेच आजचा सामना जिंकून भारताने मालिका देखील आपल्या खिशात घातली आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे.
हेही वाचा: India Vs England 4th T20: भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; 15 धावांनी पराभव करत मालिका घातली खिशात
भारताने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा केल्या. इंग्लंडला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना 166 धावा केल्या. 166 धावांवर इंग्लंडचा खेळ आटोपला. 2012 पासून इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकलेली नाही. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 181 धावांवर मजल मारली.