फोटो सौजन्य - Jio Cinema
दिल्ली विरूद्ध रेल्वे सामना : दिल्ली विरूद्ध रेल्वे यांच्यामध्ये रणजी ट्रॅाफीचा सामना पार पडला, या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने रेल्वेला पराभूत करून विजय मिळवला आहे. आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने तिसऱ्या दिवशीच रणजी क्रिकेटमध्ये रेल्वेचा पराभव केला आहे. संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक डाव आणि १९ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात रेल्वेने प्रथम खेळताना २४१ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात दिल्ली संघाने कर्णधार बडोनीच्या ९९ धावा आणि सुमित माथूरच्या ८६ धावांच्या जोरावर ३७४ धावा केल्या.
संघाला अनुभवी फलंदाज विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो केवळ सहा धावा करून वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानचा बळी ठरला. अशाप्रकारे दिल्ली संघाला पहिल्या डावात १३३ धावांची आघाडी मिळाली. रेल्वे संघ दुसऱ्या डावात अवघ्या ११४ धावांत आटोपला आणि एक डाव आणि १९ धावांनी सामना गमावला. दिल्लीकडून दुसऱ्या डावात शिवम शर्माने सर्वाधिक पाच बळी घेतले.
That moment when Delhi beat Railways! 👏👏
A comprehensive victory for them, winning by an innings and 19 runs 🙌🙌#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/IhwXam3F5T pic.twitter.com/DtpVX7OoWv
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 1, 2025
रेल्वेच्या संघामधून उपेंद्र यादव याने पहिल्या इंनिगमध्ये ९५ धावांची खेळी खेळली. तर कर्ण शर्मा याने अर्धशतकीय खेळी खेळली. याव्यतिरीक्त कोणत्याही खेळाडुने ३० हुन अधिक धावा केल्या नाही.
सुमित माथूरने आपल्या अष्टपैलू कामगिरीनंतर रेल्वेला खचाखच भरलेल्या अरुण जेटली स्टेडियमसमोर श्वास घेण्याची संधी दिली नाही आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला. २७ वर्षीय माथूरला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नाही, मात्र पहिल्या डावात त्याने तीन विकेट घेतल्या आणि फलंदाजी करताना ८६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रेल्वेचा दुसरा डाव ३०.५ षटकांत केवळ ११४ धावांत आटोपला. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज शिवम शर्माने ११ षटकांत ३३ धावा देऊन पाच बळी घेतले, ज्यात चार मेडन षटकांचा समावेश होता. त्याने रेल्वेचे सूरज आहुजा, विवेक सिंग, मोहम्मद सैफ, कर्ण शर्मा आणि राहुल शर्मा यांचे बळी घेतले. शिवमशिवाय दिल्लीकडून नवदीप सैनी, सिद्धांत शर्मा, मणी ग्रेवाल आणि कॅप्टन बडोनी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या सामन्यात विजय नोंदवत दिल्लीचे आता २१ गुण झाले असून ते गटात तिसऱ्या स्थानावर आहे. संघाने सात सामने खेळले, त्यापैकी दोन जिंकले, दोन हरले आणि तीन सामने अनिर्णित राहिले.