Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने झिम्बाब्वे मालिका घातली खिशात

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 23, 2022 | 09:44 AM
भारताने झिम्बाब्वे मालिका घातली खिशात
Follow Us
Close
Follow Us:

भारताने झिम्बाब्वे (India Vs Zimbabwe) विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतील सलग तिसरा सामना जिंकत विजयी पताका फडकावली आहे. २२ ऑगस्ट रोजी झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर १३ धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताने झिम्बाब्वे विरुद्ध ३-० अशी आघाडी घेतली.

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी ७९ चेंडूत ५० धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या ६३ वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल ४६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने इशान किशनसोबत १४० धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला.

शुभमन गिलने ८२ चेंडूत त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. या सामन्यात भारताने ५० षटकात आठ विकेट्स गमावून २८९ धावा केल्या. दरम्यान, झिम्बाब्वेच्या ब्रॅडली इवांसनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ५४ धावा खर्च करून भारताच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले.

That's that from the final ODI. A close game, but it was #TeamIndia who win by 13 runs and take the series 3-0 #ZIMvIND pic.twitter.com/3VavgKJNsS — BCCI (@BCCI) August 22, 2022

२९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन ४५ धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पण ४९ व्या षटकात सिकंदर ११५ धावा करुन बाद झाला. त्याने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असे वाटत असताना आवेशने अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव २७६ धावांवर रोखत भारताला १३ धावांनी विजयी करुन दिले.

भारतीय संघ तब्बल सहा वर्षांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून या दौऱ्यात भारतीय संघात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तर कर्णधार पदाची धुरा के एल राहुल आणि उपकर्णधार पदाची धुरा शिखर धवन याच्याकडे होती.

Web Title: India won the match and series against zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2022 | 09:44 AM

Topics:  

  • cricket
  • india
  • india vs zimbabwe
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन
1

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?
2

Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
3

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी
4

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.