त्रिनिदाद : भारताने वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिका देखील खिशात घातली आहे. (West Indies vs India 3rd ODI) काल झालेल्या शेवटचा व निर्णायक तिसरा सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर विक्रमी २०० धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या डावासारखा गडगडला. वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. पण भारताचे सतरा वर्षांपासूनचे मालिका विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. कारण वेस्ट इंडिजने यापूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका ही 06साली जिंकली होती. विश्वचषकापूर्वी भारताचा हा विजय महत्त्वाचा मानला जातोय. (India won the ODI series 2-1! record 200-run win over Windies; Powerful fifties by Gill, Kishan and Hardik Pandya)
भारताचा धावांचा डोंगर
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला. सलामी फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने वादळी अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने 64 चेंडूमध्ये 77 धावांची खेळी केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शुभमन गिल याने 85 धावा केल्या, तर कर्णधार हार्दिक पंड्या नाबाद 70 धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केलीत. ऋतुराज गायकवाड अवघ्या आठ धावांवर बाद झाला. संजू सॅमसन याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये संजू सॅमसन याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. या सर्वांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला.
शार्दुलच्य 4 विकेट, भारताचा विक्रमी विजय
352 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या वेस्ट विडिंज संघाची सुरुवात खराब झाली. युवा खेळाडू मुकेोस कुमार याने सलामीच्या दोन्ही फलंडदाजांना माघारी लावलं. कायल मेयर्स4 धावा, ब्रँडन किंग भोपळाही फोडू दिला नाही. सुरूवातचे आणि मधल्या शिप्टमधील फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र शेपडटीने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ठाकूर आणि कुलदीपने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत संघाच्या विजयावर शिक्कामोक्तब केलं. हळूहळू वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. विश्वचषकापूर्वी भारताचा हा विजय महत्त्वाचा मानला जातोय.