रविवारी मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंड संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं विजयाचा मिळवला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.
[read_also content=”एलओसी जवळ ग्रेनेड स्फोट; दोन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू, पाच जवान जखमी https://www.navarashtra.com/india/grenade-blast-near-loc-so-two-army-officers-killed-and-five-jawans-injured-in-jammu-kashmir-nrgm-305345.html”]
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावा कराव्या लागतील. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा , क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी 27-27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलनं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन तर, रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली.
[read_also content=”श्रीलंकेत आठवड्याभरात पुन्हा आणीबाणी लागू; कार्यवाह अध्यक्षांचे आदेश https://www.navarashtra.com/world/emergency-again-in-sri-lanka-within-week-acting-president-ranil-wickramasinghe-order-nrgm-305303.html”]