Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

Indian Army Won Gold Medal in World Rowing Cup III in Switzerland: भारतीय लष्कराचे दोन जवान, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग यांनी लुसर्न येथे झालेल्या २०२६ च्या वर्ल्ड रोइंग कप ३ मध्ये लाईटवेट पुरुषांच्या डबल स्कल्सच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावून आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 04:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास
  • लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले सुवर्णपदक
  • सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली
भारतीय लष्कराचे दोन जवान, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग यांनी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या २०२६ वर्ल्ड रोइंग कप थ्री ( Rowing Cup III in Switzerland) प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. लाईटवेट पुरुषांच्या डबल स्कल्सच्या अंतिम फेरीत, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत ६ मिनिटे २६.०९ सेकंदांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना हाँगकाँग आणि नेदरलँड्सच्या जोड्यांकडून कडवी स्पर्धा मिळाली, परंतु दमदार कामगिरी करत त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

देशाने जागतिक रोइंग कप मालिकेत पहिल्यांदा जिंकले सुवर्णपदक

लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग ही जोडी त्यांच्या पहिल्याच वर्ल्ड रोइंग कप मालिकेत देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. त्यांनी ६:२६.०९ वेळेत शर्यत पूर्ण केली, तर हाँगकाँगचे सॅन तुंग लाम आणि टिक लुन चान ६:२७.१४ वेळेत दुसऱ्या स्थानी राहिले. या स्पर्धेत नेदरलँड्सचे एरिक व्हॅन आइक व्हॅन हेस्लिंगा आणि फ्रेडरिक प्लोएग ६:२७.३६ वेळेत तिसऱ्या स्थानी राहिले. लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग दोघेही भारतीय सैन्यात सैनिक असून लुसर्नमधील भारतीय तुकडीचा भाग आहेत. या रेगाटामध्ये सहभागी झालेल्या १८ सदस्यीय संघात १७ खेळाडू भारतीय सैन्याचे आणि एक भारतीय नौदलाचा आहे. ही रेगाटा लुसर्नच्या प्रसिद्ध रोटसी लेकवर झाली. हे लेक २०००-मीटर-लांब, सहा-लेनच्या मार्गामुळे जगातील सर्वोत्तम रोइंग ठिकाणांपैकी एक मानला जातो.

याआधी जिंकले ३ कास्यंपदक

जागतिक रोइंग चषकात सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी भारताने तीन कांस्य पदके जिंकली होती. पहिले पदक २००९ मध्ये महिलांच्या गटात, तर दुसरे आणि तिसरे पदक २०१९ आणि २०२२ मध्ये पॅरा पेअर गटात जिंकले होते. २६ ते २८ जून दरम्यान लुसर्न येथे झालेल्या तिसऱ्या जागतिक रोइंग चषकात ४२ देशांतील ६५० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता आणि ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक रोइंग चॅम्पियनशिपच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

Web Title: Indian army lakshay and ujjwal won gold medal in world rowing cup 2026 india rowers lucerne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • gold medal
  • indian army
  • indian army news
  • switzerland

संबंधित बातम्या

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !
1

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

Gorkha Recruitment : नेपाळी गोरखांना भारतीय सैन्यात पुन्हा भरती करा; अग्निवीर योजनेच्या समर्थनार्थ पोखरात मोठे आंदोलन!
2

Gorkha Recruitment : नेपाळी गोरखांना भारतीय सैन्यात पुन्हा भरती करा; अग्निवीर योजनेच्या समर्थनार्थ पोखरात मोठे आंदोलन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.