आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव एक मोठा धक्का आहे. रतीय संघाने आपल्या मागील १६ टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जगभरातील संघांवर वर्चस्व गाजवले आहे. या काळात भारताने दोनदा टी२० विश्वचषक आणि एकदा आशिया कप जिंकला. त्यांनी आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकही जिंकले. या आयर्लंड दौऱ्यापूर्वी, भारताने सलग १६ द्विपक्षीय टी-२० मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. भारताचा यापूर्वीचा पाच सामन्यांच्या मालिकेतील पराभव ऑगस्ट २०२३ मध्ये झाला होता, जेव्हा ते वेस्ट इंडिजकडून २-३ ने हरले होते. गेल्या वर्षांत भारतीय संघाने एकूण ७३ टी-२० सामने खेळले, पण कोणताही संघ भारताला मालिकेत पराभूत करू शकला नाही. या १७ मालिकांपैकी केवळ एकच मालिका अनिर्णित राहिली. पण आता आयर्लंडच्या भूमीवरही मालिका विजयाची मालिका खंडित झाली आहे.
रविवारी स्टॉर्मोंट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात जय मुंद्राने आपल्या घातक गोलंदाजीने पहिल्या दोन चेंडूंवर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना शून्यावर बाद केले. . यानंतर, त्याने कर्णधार श्रेयस अय्यरची महत्त्वाची विकेट घेऊन भारताचे कंबरडे मोडले. आयर्लंडच्या १५४ धावांच्या प्रत्युत्तरात, भारतीय संघ ९ विकेट्स गमावून केवळ १५३ धावा करू शकला आणि फक्त धावेने सामना गमावला.
या सलग दोन पराभवांमुळे, ३१ वर्षीय श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून आपले पहिले दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने गमावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम केवळ ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने जून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत कर्णधार म्हणून पदार्पण केले होते आणि आपले दोन्ही सुरुवातीचे सामने गमावले होते.






