सूर्यकुमारच्या तब्बेतीबाबत महत्त्वाचे अपडेट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या ब्रेकवर आहे. सूर्याने अलिकडेच आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली. सूर्या सध्या जर्मनीमध्ये आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट शेअर केली आहे. सूर्यकुमार यादववर जर्मनीमध्ये स्पोर्ट्स हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्याने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली असून त्याच्या चाहत्यांनी यावर काळजीने कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सूर्यकुमार यादव यामुळे एका मोठ्या सिरीजला मुकणार असल्याचे आता समोर येत आहे. सूर्यकुमारने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आपली हेल्थ अपडेट देत आपण व्यवस्थित असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया
३४ वर्षीय सूर्यकुमारने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला आणि आरोग्याची माहिती दिली. रोहित शर्मानंतर बीसीसीआयने टी-२० संघाची कमान त्याच्याकडे सोपवली आहे. शस्त्रक्रियेमुळे तो बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागतील. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल.
काय आहे सूर्यकुमारची पोस्ट
सूर्यकुमार यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘लाइफ अपडेटः उजव्या पोटाच्या खालच्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मी बरा होण्याच्या मार्गावर आहे आणि हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे. क्रिकेट मैदानात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.’ याचा अर्थ असा की तो लवकरच क्रिकेट मैदानात परतेल अशी आशा त्याच्या चाहत्यांनी बाळगली आहे. पण त्याचबरोबर त्याच्या तब्बेतीबाबत काळजीही सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
T20 साठी सूर्या महत्त्वपूर्ण
सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक शानदार खेळी केल्या आहेत. त्याचे चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. तेथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.
त्यानंतर संघ बांगलादेशचा दौरा करेल. बांगलादेशमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाईल. पहिला टी-२० सामना २६ ऑगस्ट रोजी आणि शेवटचा सामना ३१ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. मात्र सूर्याची तब्बेत पाहता ही सिरीज सूर्यकुमार यादव करू शकेल की नाही याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
बांगलादेश सिरीज मुकणार
सूर्यकुमार यादव या दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागतात. त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-२० ची मोठी स्पर्धा आहे. २०२६ चा टी-२० विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. त्यात एकूण २० संघ खेळतील. या विश्वचषकात सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करतील.
सूर्यकुमार यादवने वयाच्या ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १ कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ८३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि टी-२० मध्ये २५९८ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ४ अर्धशतके केली आहेत पण एकही शतक नाही. त्याने टी-२० मध्ये ४ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत.
सूर्याची पोस्ट