टिम इंडिया(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या डावात ३७१ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंड संघाने ही लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण करुण भारताचा पराभव केला. इंग्लंडकडून चौथ्या डावात सलामीवीर बेन डकेटने शानदार शतकी खेळी करुन संघाचा विजय निश्चित केला. पाचव्या दिवशी ब्रिटिशांनी संघाने ३५० धावांचा टप्पा सहज गाठला. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी मिळवली आहे.
बेन डकेटने १७० चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. या खेळीत त्याने २१ चौकार लगावले. याशिवाय त्याचा जोडीदार सलामीवीर जॅक क्रॉलीने देखील ६५ धावा करुन महत्वाची भूमिका बाजवली. डकेट आणि क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास कमी झालेला दिसून आला. नंतर जो रूटने ५३ धावा आणि जेमी स्मिथने ४४ धावा करुण विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा पराभव होताच दिनेश कार्तिकने भारतावर निशाणा साधला आणि टिमची डोबरमन कुत्र्यासोबत तुलना केली.
हेही वाचा : IND vs ENG : पहिल्या कसोटी पराभवानंतर कोच Gautam Gambhir ची मोठी घोषणा! क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड..
लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाची तुलना डोबरमनशी करण्यात आली. दिनेश कार्तिकने स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल सांगितले तेव्हा सर्वांना हे कळले. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे टीम इंडियाची तुलना कुत्र्याशी का केली गेली?
टीम इंडियाची तुलना थेट डोबरमन कुत्र्याशी..
दिनेश कार्तिकने इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल स्काय स्पोर्ट्सवर सांगितले की, “भारतीय संघाची तुलना कधी आणि कोणी डोबरमन कुत्र्याशी केली.” दिनेश कार्तिक म्हणाला की, त्याने ट्विटरवर काहीतरी लिहिलेले पाहिले, ज्यामध्ये म्हटले होते की ‘टीम इंडियाची फलंदाजी डोबरमन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग देखील ठीक आहे, परंतु त्याला शेपूट नाही.’
लीड्समधील पराभवानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या बाबतीत मोठा धक्का बसला आहे. WTC 2025-27 च्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केली ज्यामुळे त्यांना पॉइंट टेबलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने येथे थेट चौथ्या स्थानावरून सुरुवात केली आहे. सध्या भारताचे 0 गुण आहेत.