Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू फक्त एक…’ गौतम गंभीरचा इंग्लंडच्या ग्राऊंडमॅनवर चढला रागाचा पारा, सर्वांसमोर धमकी, Video ने घातला धुमाकूळ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. दरम्यान ओव्हलच्या मैदानावर एक अशी गोष्ट घडली आहे जी व्हायरल होत आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 30, 2025 | 10:17 AM
गौतम गंभीरचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

गौतम गंभीरचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. यजमान संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यांनी लीड्स आणि लॉर्ड्स येथे दोन सामने जिंकले. भारताने बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. आता मालिका अनिर्णित राहण्यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकावा लागेल. या सामन्यापूर्वी ओव्हल येथे एक मोठी घटना घडली. भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ओव्हलच्या ग्राउंड्समनला फटकारले.

गंभीर आणि लंडनच्या ओव्हल मैदानाचे हेड ग्राउंड्समन ली फोर्टिस यांच्यात जोरदार वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीरने क्युरेटरला स्पष्ट सांगितले की, “तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू शकत नाही.” त्यांच्याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक सिताशु कोटक यांनीही फोर्टिसशी संवाद साधला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये गंभीर खूपच रागावलेला दिसत आहे.

IND vs ENG: एक शेवटची संधी, ‘Last Fight’ साठी तयार आहे भारत, कोच गंभीरने इंग्लंडला डिवचले, म्हणाला ‘इंग्लंडचा दौरा नेहमीच…’

गंभीरने काय म्हटले?

#WATCH | London, UK: Indian team’s Head coach Gautam Gambhir was seen having a heated conversation with the Oval Pitch Curator, at The Oval Cricket Ground in London, ahead of the last Test match of the series starting 31st July.

England is leading the series 2-1 against India pic.twitter.com/L7oizszewN

— ANI (@ANI) July 29, 2025

हा व्हिडिओ भारताच्या सराव सत्रातील असून खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये गंभीर असे म्हणताना ऐकू येते की, “तुम्हाला जो रिपोर्ट करायचा आहे तो करा… तुम्ही फक्त ग्राउंड्समन आहात.” व्हिडिओमध्ये हीच ओळ सतत दाखवली जात आहे. गंभीर मैदानावरील खेळाडूकडे बोट दाखवत आहे. वादाचे कारण अद्याप कळलेले नाही. गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका सतत चर्चेत आहे आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना नाहक त्रास दिल्याचेही दिसून येत आहे. अलिकडेच, ओल्ड ट्रॅफर्ड येथील शेवटच्या कसोटीत, बेन स्टोक्सने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना ड्रॉ करण्याची ऑफर दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. 

Rishabh Pant: ‘माझे फ्रॅक्चर कधी बरे होईल…’ सोशल मीडियावर ऋषभ पंतची भावूक पोस्ट, धाडसाने जिंकले जगाचे मन

पिच क्युरेटरचे उत्तर

#WATCH | London, UK: Lee Fortis, Oval Pitch Curator says, “It is quite a big game coming up. It is not my job to be happy with him (Gautam Gambhir) or not. I have never met him before today. You saw what he was like this morning. It’s okay, I am fine. We have nothing to hide…” https://t.co/3K5jjnpTiw pic.twitter.com/FQ8LuDYjQM

— ANI (@ANI) July 29, 2025

या घटनेनंतर, ओव्हलचे पिच क्युरेटर ली फोर्टिस यांनी त्यांच्या बचावात म्हटले की, “येणारा सामना खूप मोठा आहे. तो (गौतम गंभीर) आनंदी आहे की नाही हे माझे काम नाही. मी आजपर्यंत त्याला कधीही भेटलो नाही. आज सकाळी तो कसा वागत होता हे तुम्ही पाहिले. काही हरकत नाही, मी ठीक आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही…”

गौतम गंभीरवर विजयाचा दबाव

मँचेस्टर सामना बरोबरीत सुटला आणि इंग्लंड अजूनही मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे. भारताला बरोबरी साधण्याची संधी आहे आणि गंभीर दबावाखाली आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने आतापर्यंत १४ कसोटींमध्ये फक्त चार विजय मिळवले आहेत. “गेले पाच आठवडे दोन्ही देशांसाठी खरोखरच रोमांचक होते. ज्या प्रकारच्या क्रिकेटचे प्रदर्शन झाले त्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अभिमान वाटला आहे याची मला खात्री आहे. दोन्ही संघांनी खूप जोरदार प्रहार केले आणि प्रत्येक रन्ससाठी लढा दिला. आपल्याकडे आणखी एक आठवडा आहे आणि हा एक शेवटचा धक्का. आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी शेवटची संधी आहे. जय हिंद,” असे गंभीर सोमवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासोबत झालेल्या टीम मीटिंगमध्ये म्हणाला आहे. 

Web Title: Indian head coach gautam gambhir got angry at oval groundsman during training session scolded him video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • Test Match

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
1

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
2

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील
3

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.