
आकाश दीप अडकणार विवाहबंधनात
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे आकाश दीप
२४ जून रोजी होणार आकाश दीप करणार विवाह
Akash Deep Wedding: आकाश दीप भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज आकाश दीप लवकरच आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासारामचा रहिवासी असलेला आकाश दीप येत्या २४ जून २०२६ रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आकाश दीपच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे.
नुकतेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने बिहारच्या क्रीडा मंत्री श्रेयसी सिंह यांची भेटू घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याचे समोर आले आहे. तसेच आकाश दीपच्या लग्नाला बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भारतीय संघाचे अनेक खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आकाश दीपचे २४ जून रोजी लग्न होणार आहे. आकाश दीपची होणारी पत्नी अक्षिता राज ही माणिकपूर येथील रहिवासी आहे. आकाश दीप आणि अक्षिता राज यांचा विवाह वाराणसी येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये होणार असल्याचे समोर येत आहे. २१ जून रोजी तिलक समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तास २२ जून रोजी मेहंदी सोहळा पार पडणार आहे.
२३ जून रोजी हळदीचा कार्यक्रम होईल. आणि २४ जून रोजी आकाश आणि अक्षिता राज विवाहबंधनात अडकणार आहे. भारतीय संघाचा गोलंदाज आकाश दीपने बिहारच्या क्रीडा मंत्री श्रेयसी सिंह यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याचे समोर येत आहे. लग्नाचे मुख्य विधी वाराणसीत होणार असले, तरी आकाश दीपच्या पैतृक गावी म्हणजेच बड्डी (रोहतास) येथे लग्नापूर्वीचे सर्व पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
बातमी अपडेट होत आहे…