Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs  BAN W : भारतीय महिला संघाच्या डिसेंबर २०२५ च्या मालिकेत मोठा बदल! संपूर्ण दौरा आता अनिश्चित अवस्थेत

भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ यांच्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. परंतु, आता हा दौरा अनिश्चित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 18, 2025 | 07:14 PM
IND W vs BAN W: Big change in Indian women's team's December 2025 series! Entire tour now in limbo

IND W vs BAN W: Big change in Indian women's team's December 2025 series! Entire tour now in limbo

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs  BAN W : २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतपद मिळवल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाचा आगामी दौरा बांगलादेशात होता. या दौऱ्यादरम्यान, भारतीय महिला संघ बांगलादेश महिला संघाविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होती. परंतु, आता हा दौरा अनिश्चित अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता, बीसीसीआय मालिका पुढे ढकलण्यास अनिच्छुक  असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे पुरुष संघाच्या मालिकेनंतर महिला संघाच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार

बांगलादेशमधील परिस्थितीचा मालिकेला फटका?

वृत्तानुसार, बीसीसीआयकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डला व्हाईट-बॉल मालिका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव देणारे औपचारिक पत्र पाठवण्यात आले आहे. बोर्डाने पत्रात कोणतेही अधिकृत कारण नमूद केलेले नाही, परंतु ESPNcricinfo असे सुचवते की बांगलादेशमधील दीर्घकाळापासून सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार या निर्णयामागील एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.

शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध अलिकडे तणावपूर्ण असल्याचे देखील देसत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे, सध्याचे सरकार भारतावर नाराज असल्याचे देखील वृत्त आहे. राजकीय आणि राजनैतिक परिस्थिती देखील दौऱ्याच्या निर्णयावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे.

२०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. बांगलादेशने या स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली होती. संघाने सातपैकी फक्त एक सामना जिंकला होता आणि  पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

विश्वचषकानंतर, बीसीबीला आशा होती की भारत या वर्षाच्या अखेरीस नियोजित दौरा पार पडेल. मात्र, सध्याच्या परिस्थिती पाहता, बीसीबी याच्या बाजूने दिसत नाही. आता, बीसीबी सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय महिला संघ बांगलादेश दौरा करणार असल्याने त्यावर लक्ष ठेवून आहे. तथापि, बीसीबीकडून अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय?

राजकीय परिस्थितीवर दौरा अवलंबून

तज्ज्ञांचे असे मत आहे की बांगलादेशातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत टीम इंडियाचा बांगलादेश दौरा नियोजित करणे कठीण होणार आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आधीच अनेक परदेश दौरे पुढे ढकलले असून महिला संघाच्या दौऱ्याबाबत कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत.

Web Title: Indian womens team faces tough schedule for bangladesh tour in december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.