बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
ICC fines Babar Azam : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मैदान्त रंग व्यक्त करणे चांगलेच महाग पडले आहे. आयसीसीकडून बाबर आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर त्याने रागाने त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती, ज्यामुळे त्याला आता मोठा दंड ठोठावण्यात आला. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी अपेक्षित असताना तो ३४ धावांवर बाद झाला आणि त्याने आपला संयम गमावल. या घटनेमुळे बाबरच्या अडचणी वाढ झाली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये बाद झाल्यानंतर भावनांवर नियंत्रण न ठेवू शकलेल्या आझमला आता महागात पडले आहे. २१ व्या षटकात विकेट गमावल्यानंतर त्याने रागाने थेट स्टंपवर बॅट आदळली. मैदानावरील पंच अॅलेक्स व्हार्फ आणि रशीद रियाझ यांच्याकडून थर्ड अंपायर शर्फुद्दीन शाहिद यांच्यासह ताबडतोब ही घटना सामनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
बाबर आझम आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे, जो खेळाडूंना कोणत्याही क्रिकेट उपकरणाचे नुकसान करण्यास मनाई करत असतो. चौकशीनंतर, सामनाधिकारी अली नक्वी यांनी बाबर आझमवर ला त्याच्या सामन्याच्या फीच्या १०% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देखील नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा लेव्हल १ चा मानला जातो, जो गंभीर मानला जात नाही. तथापि, बाबर आझम धोका कायम आहे. जर बाबरने असे वर्तन पुन्हा केले तर त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या ५०% पर्यंत अतिरिक्त दंड होण्याची शक्यता आहे आणि त्याचे डिमेरिट पॉइंट वाढल्याने निलंबनाचा धोका वाढणार आहे.
बाबर आझमवर बंदी असूनही, ही मालिका बाबर आझमसाठी सकारात्मक राहिली. त्याने तीन सामन्यांमध्ये १६५ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एका शानदार शतकाचा समावेश होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, त्याने नाबाद १०२ धावा करून दोन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता.
मालिकेतील त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक देखील झाले आहे. परंतु तिसऱ्या सामन्यातील भावनिक चुकीमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली. आता, त्याला आगामी सामन्यांमध्ये त्याच्या वर्तनाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा वाढत्या डिमेरिट पॉइंट्स एक मोठे समस्या निर्माण होऊ शकते.
हेही वाचा : IPL 2026 ! एडन मार्करमने मानले LSG चे आभार! नव्या IPL हंगामाची करणार जोरदार सुरुवात






