फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका : भारताचा महिला संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध ३ सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारताचा महिला संघ विश्वचषकामध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे उपांत्य फेरीमधून बाहेर झाला. विश्वचषकामध्ये टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघाना पराभूत केलं होते, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टीम एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. यामध्ये भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाचा ५९ धावांनी पराभव केला होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी मालिकेचा पहिला एकदिवसीय सामना पार पडला. दुखापतीमुळे हरमनप्रीतला गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागले आणि तिच्या जागी स्मृती मंधानाने संघाचे नेतृत्व केले. यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या संघाला फलंदाजी करत न्यूझीलंडने टीम इंडियाला ४४.३ शिल्लक असताना न्यूझीलंडने २२७ धावांवर रोखले. यामध्ये युवा खेळाडू तेजल यासबनीसने ४२ धावांची खेळी खेळली. तर अष्टपैलू दीप्ती शर्माने संघासाठी ४१ धावा केल्या. यस्तिका भाटियाने संघासाठी ३७ धावांची महत्वाची खेळी खेळली.
हेदेखील वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शामीने चाहत्यांची आणि बीसीसीआयचे मागितली माफी! व्हिडीओ व्हायरल
पहिल्या सामन्यातील भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर संघाने कमालीची गोलंदाजी केली. भारताची फिरकी गोलंदाज राधा यादवने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर साईमा ठाकोरने दोन फलंदाजांना ड्रेसिंग रूमचा रास्ता दाखवला. अरुंधरी रेड्डीने १ विकेट नावावर केला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला संघामध्ये आज दुसरा सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे संघामध्ये पुनरागमन आहे. न्यूझीलंडच्या संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात नक्कीच कमबॅक करण्याची त्यांना संधी आहे. हा लेख होईपर्यत सामन्याचे ११ ओव्हर झाले आहेत, परंतु भारतीय संघाच्या हाती एकही विकेट अजुनपर्यत लागलेली नाही.
A look at our Playing XI 🙌
Debut 🧢 for Priya Mishra 👏
Updates ▶️ https://t.co/h9pG4I31li#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BmRDXsGkOd
— BCCI Women (@BCCIWomen) October 27, 2024
भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. भारत न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु झाला आहे. या सामन्याचे नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केले जाईल. तर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.