फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामी हेल्थ अपडेट : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून वगळण्यात आले आहे. भारताच्या संघाने दोन दिवसांपूर्वीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या संघाने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर काही अनुभवी खेळाडूंना सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या संघामध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. मागील एक वर्षांपासून भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हापासून तो दुखापतीमधून अजुनपर्यत सावरला नाही. त्यामुळे मोहम्मद शामीचे संघामध्ये पुनरागमन होणार यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून मोहम्मद शामीला संघामधून बाहेर काढल्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागितली आहे. नक्की प्रकरण काय यावर एकदा नजर टाका. मोहम्मद शमीने कसरतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे यामध्ये त्याने लिहिले आहे की, “माझे प्रयत्न सुरू आहेत आणि माझ्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीने दिवसेंदिवस चांगले होत आहे. सामन्यासाठी तयार होण्यासाठी आणि देशांतर्गत लाल चेंडू क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करत राहीन. सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि बीसीसीआयला क्षमस्व, पण लवकरच मी रेड बॉल क्रिकेट खेळायला तयार आहे, तुम्हा सर्वाना खूप प्रेम.
हेदेखील वाचा – टीम इंडिया WTC मधून बाहेर झाली तर कोणते देश खेळणार फायनल? जाणून घ्या कोण आहेत दावेदार
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हा मजबूत संघ आहे, भारताच्या संघाच्या शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी T२० विश्वचषकात झाला होता. त्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करावी लागेल आणि त्यानंतरच ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळू शकणार आहेत. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला १८ सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. टीम इंडियात निवड न झाल्याने मोहम्मद शमीची प्रतिक्रिया पहिल्यांदाच समोर आली आहे. आता मोहम्मद शामी कधी भारतीय संघामध्ये पुनरागमन करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.