फोटो सौजन्य - सोशल मीडिया
लिजेंड्स लीग क्रिकेट २०२५ : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला युवराज आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये सहभागी होणार असून तो इंडिया मास्टर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. ही लीग २२ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. युवराज सिंगने २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले होते. तेव्हापासून त्यांची प्रतिमा सिक्सर किंग अशी झाली होती. हा विश्वचषक भारताने जिंकला आणि त्यात युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.
SL vs AUS : नॅथन लियॉनची अविश्वनीय कामगिरी, एकाच फलंदाजाला एकाच सेशनमध्ये केलं दोनदा बाद, असे दृश्य कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच
२०११ मध्ये भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यातही युवराजची महत्त्वाची भूमिका होती. लवकरच त्याच्या आयुष्यावर बॉलीवूड सिनेमा देखील येणार आहे, या चित्रपटाची घोषणा त्याने सोशल मीडियावर केली होती. युवराज सिंह या त्याच्या कठीण काळामध्ये सुद्धा मैदानावर भारतासाठी उभा होता हे संपूर्ण जगाने पहिले आहे. आता पुन्हा एकदा युवराज सिंह मैदानावर क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
या लीगमध्ये युवराज सिंगशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जेपी ड्युमिनीही सहभागी होणार आहे. मास्टर्स स्पर्धेत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करेल. ही त्याच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ड्युमिनी म्हणाला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेचा माजी फलंदाज उपुल थरंगाही या लीगमध्ये श्रीलंका मास्टर्सकडून खेळताना दिसणार आहे. थरंगानेही या लीगमध्ये खेळल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
YUVRAJ SINGH RETURNS TO CRICKET 🚨
– Yuvraj Singh will be playing under Sachin Tendulkar for India Masters in IML T20, starting on February 22nd.@TamilnaduD @rohit_yuvi2512 @sumantajha7 @SRKRAJKUMAR12 pic.twitter.com/gOmNHIiNzT
— harry (@harman10566896) February 1, 2025
या लीगमध्ये सामील झाल्यानंतर युवराज म्हणाला, “या लीगमध्ये सचिन तेंडुलकर आणि माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांसोबत खेळणे म्हणजे माझे जुने दिवस आठवण्यासारखं असेल. या सर्वांसोबत खेळल्यामुळे अनेक आठवणी जाग्या होतील. माझ्यासाठी ही लीग एक महत्त्वाची आहे. त्या युगाला सलाम.” भारतीय क्रिकेट बदलून टाकणारे काहीतरी करायला.”
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेचा पुन्हा भंग, एक नाही तर तीन चाहते मैदानात घुसले मैदानात
इंडिया मास्टर लीग भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जाईल. या लीगचे सामने नवी मुंबई, राजकोट आणि रायपूर येथे होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारे क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळतील. इंडिया मास्टर्स संघात सचिन तेंडुलकरसारखा खेळाडूही असेल. या लीगमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, इंग्लंडचा इऑन मॉर्गन हे देखील सहभागी होणार आहेत.