Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक ‘आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल’; ‘या’ देशांचे पैलवान खेळणार स्पर्धा

wrestling News: संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2025 | 03:59 PM
Sports News: जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक 'आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल'; 'या' देशांचे पैलवान खेळणार स्पर्धा

Sports News: जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक 'आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल'; 'या' देशांचे पैलवान खेळणार स्पर्धा

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात येणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.

या दंगलीमुळे कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी लाभणार असल्यामुळे लाखो कुस्तीप्रेमींच्या नजरा आतापासूनच लागल्या आहेत. १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होणारा नमो कुस्ती कुंभ रात्री ८ वाजेपर्यंत एकापेक्षा एक लढतीचा थरार सादर करणार आहे. कुस्तीला समर्पित असलेले हे आयोजन जामनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडेल, याबाबत आयोजकांना दृढ विश्वास आहे. या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा: पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला दाखवलं आस्मान

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत बाजी मारत ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली.

Web Title: International wrestling competition at jamner jalgaon sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Kusti
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
4

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.