Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात ‘हे’ खेळाडू करतील सुपर कामगिरी; वाचा सविस्तर

  • By युवराज भगत
Updated On: May 09, 2024 | 06:24 PM
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात ‘हे’ खेळाडू करतील सुपर कामगिरी; वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

IPL 2024 GT vs CSK Match : आयपीएल 2024 स्पर्धेतील 59वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर गुजरात टायटन्स आता उर्वरित सामने आत्मसन्मानासाठी खेळणार आहेत. त्यामुळे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजय सहजासहजी मिळणार नाही.

IPL 2024 स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरू

आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, प्लेऑफसाठी लढत सुरू आहे. अजूनही कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले नाही. गणिती भाषेत कोलकाता आणि राजस्थानचे स्थान पक्कं झाले आहे. पण, त्यातही टॉप 4 मध्ये दोलयामान स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढले आहे. आयपीएल स्पर्धेतील 59वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे.

चेन्नईसाठी विजय खूपच महत्त्वाचा

या सामन्यातील विजय चेन्नईसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफचं गणित सोडवायचं तर हा विजय आवश्यक आहे. पण चेन्नईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र पुढचं खूपच कठीण होऊन बसेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित सामने आत्मसन्मानासाठी लढताना दिसेल.

आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सहा वेळा आमने-सामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी एकमेकांना 3 वेळा पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ या वर्षी 26 मार्चला भिडले होते. तेव्हा चेन्नईने 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हा सामना गुजरातने 63 धावांनी गमावला होता. त्यामुळे नेट रनरेटवर फटका बसला होता.

हे खेळाडू सामना फिरवू शकतात

आता गुरुवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सचे 4, तर चेन्नईचे 7 खेळाडू बेस्ट ठरतील. गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल, डेविड मिलर, राशीद खान, साई सुदर्शन हे खेळाडू बाजी मारू शकतात. तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शार्दुल ठाकुर, दीपक चहर आणि मथीसा पाथिराना हे खेळाडू सामना फिरवू शकतात.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना समान फायदा देणारी आहे. या ठिकाणी खेळला गेलेला शेवटचा आयपीएल सामन्यात सर्वोत्तम धावसंख्या झाली होती. गुजरातने आरसीबीला 200 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान आरसीबीने 16 षटकात पूर्ण केलं होतं.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
गुजरात टायटन्स : मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

इम्पॅक्ट प्लेयर: अभिनव मनोहर

चेन्नई सुपर किंग्स : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.

इम्पॅक्ट प्लेयर: सिमरजीत सिंग

Web Title: Ipl 2024 gt vs csk match live which players from chennai and gujarat teams will be the vest find out nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 06:23 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • Gujarat Titans

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.