फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
आयपीएल २०२५ चा पहिला सामना KKR vs RCB : आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस करण्यात आला. त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात आरसीबीने अनेक उत्कृष्ट खेळाडूंना खरेदी केले. त्यानंतर हे खेळाडू नवीन सीझनमध्ये खळबळ माजवताना दिसणार आहेत. आरसीबी नवीन कर्णधार, नवीन उत्साह आणि नवीन रणनीतीसह १८ व्या हंगामात प्रवेश करेल. काल म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आयपीएल २०२५ चा महिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघामध्ये रंगणार आहे.
यावेळी आरसीबीच्या संघात अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त ११ खेळाडूंना संधी मिळेल. आता आम्ही तुम्हाला केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असतील याबद्दल माहिती देणार आहोत. या नव्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नव्या कर्णधारांची घोषणा केली आहे. या आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात रजत पाटीदार आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
🚨 IPL 2025 Full Schedule Released! 🚨
🗓️ Here’s when, where, and who we’ll face in the #TataIPL2025. 🔥
We’re locking horns with CSK, RR, PBKS, KKR and DC twice. We play MI, GT, LSG and SRH once. 💪
Save the dates, 12th Man Army. We are ready to #PlayBold! 🙌 #ನಮ್ಮRCB… pic.twitter.com/92NpYAw8e3
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 16, 2025
यावेळी आरसीबीने फाफ डू प्लेसिसला सोडले, तर मेगा लिलावात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल साल्टला विकत घेतले. १८ व्या हंगामात फिल साल्ट विराट कोहलीसोबत आरसीबीसाठी ओपनिंग करताना दिसतील. या जोडीकडून आरसीबी संघ आणि चाहत्यांना खूप अपेक्षा असतील. या दोघांव्यतिरिक्त, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल हे देखील वरच्या फळीत मोठी जबाबदारी पार पाडताना दिसतील. अशा परिस्थितीत हे खेळाडू कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांवर कहर करू शकतात.
जर आपण आरसीबीच्या मधल्या फळीबद्दल बोललो तर संघाला विल जॅक्सची उणीव नक्कीच जाणवेल. ज्यांना आरसीबीने मेगा लिलावापूर्वी सोडले होते, परंतु यावेळी लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि कृणाल पंड्यासारखे खेळाडू धमाल करताना दिसतील. आरसीबीमध्ये भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. आरसीबीने मेगा लिलावात भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याशिवाय जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा यांसारख्या गोलंदाजांवरही मोठी जबाबदारी असणार आहे.
🔥RCB Squad for IPL 2025🔥
.#rcb #ipl2025auction #ipl2025 #PrithviShaw #msdhoni #ChampionsTrophy pic.twitter.com/cQdxBR6qFt— IPL 2023 (@2023Ipl) November 27, 2024
विराट कोहली, फिल साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, लियाम लिवोंगस्टोन, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल आणि सुयश शर्मा.