फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Big update on Jasprit Bumrah’s injury : मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला आणि या सामन्यात मुंबईला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिला सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या संघाचा भाग नव्हता तर त्याचबरोबर त्यांचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहा मागील तीन महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. जवळजवळ आत्तापर्यंत तीन महिने झाले आहेत जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसलेला नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. जस्सीला पाठदुखीचा त्रास आहे.
या कारणास्तव, तो आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या छावणीत दिसलेला नाही. पण आता एमआयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बुमराह आता मैदानात परतला आहे. भारतीय संघ डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. जस्सीने संपूर्ण मालिकेत उत्तम कामगिरी केली. पण शेवटच्या सामन्यात या स्टार गोलंदाजाला दुखापत झाली, ज्यामुळे बुमराहला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडावे लागले. तथापि, आता जस्सी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Bumrah has started bowling in NCA. Don’t know when he will get the clearance but feeling better after watching this clip. pic.twitter.com/FTpnuVoJoW
— R A T N I S H (@LoyalSachinFan) March 30, 2025
जस्सी एनसीएमध्ये सतत पुनर्वसन करत होता आणि तो बेंगळुरूमध्ये होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जस्सी पूर्ण ताकदीने नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. याचा अर्थ असा की तो लवकरच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल हे स्पष्ट आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे.
Aakash Chopra has stated that Mumbai Indians need their premier pace bowler, Jasprit Bumrah, to be fit and available to turn around their fortunes in IPL 2025. pic.twitter.com/jTql2og5hT
— CricTracker (@Cricketracker) March 30, 2025
आयपीएल २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्सने त्यांचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला. या सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यातही मुंबईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत दोन्ही सामने खेळले. तथापि, आता जस्सीकडे पाहता, असे दिसते की त्याला लवकरच NACA कडून हिरवा कंदील मिळेल, ज्याची तो वाट पाहत आहे. अजुनपर्यत मुंबई इंडियन्सच्या संघाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. सर्वच क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहला आयपीएल २०२५ मध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.