फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
India vs Australia series schedule : भारताच्या संघाने नुकतीच आयपीएल २०२५ आधी चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली आणि संपूर्ण संघ पराजित राहिला. यामध्ये भारताच्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता कमालीची कामगिरी केली आहे. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकली होती. जिथे भारताने दहा वर्षांनंतर कांगारू संघाकडून मालिका गमावली. या मालिकेनंतर, दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येण्यास सज्ज आहेत. आता सध्या आयपीएलचा १८ वा सिझन सुरु आहे.
RR vs CSK : विजयाच्या वाटेवर कोण परतणार? आज राजस्थान आणि चेन्नई आमनेसामने, जाणून घ्या A to Z माहिती
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे, जिथे एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय, पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
२०२५-२६ हंगामात भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील. भारत १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी आठ सामने खेळेल. ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका देखील खेळेल, ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तेवढेच टी-२० सामने असतील.
सामना | तारिख | ठिकाण |
---|---|---|
पहिला एकदिवसीय सामना | 19 ऑक्टोबर | पर्थ स्टेडियम |
दुसरा एकदिवसीय सामना | 23 ऑक्टोबर | अॅडलेड ओव्हल |
तिसरा एकदिवसीय सामना | 25 ऑक्टोबर | एससीजी |
दोन्ही संघांचे लक्ष हे t20 मालिकेवर जास्त असेल कारण भारत आणि श्रीलंकेमध्ये 2026 च्या t20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय
सामना | तारिख | ठिकाण |
---|---|---|
पहिला T20 | 29 ऑक्टोबर | मनुका ओव्हल |
दुसरा T20 | 31 ऑक्टोबर | एमसीजी |
तिसरा T20 | 2 नोव्हेंबर | बेलेरिव्ह ओव्हल |
चौथा T20 | 6 नोव्हेंबर | गोल्ड कोस्ट स्टेडियम |
पाचवा T20 | 8 नोव्हेंबर | गाबा |
ऑस्ट्रेलियाचे लक्ष टी-२० क्रिकेटवर अधिक असेल, कारण पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत टी-२० विश्वचषक होणार आहे आणि सर्व संघ त्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली आहे की ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका देखील खेळेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ‘२०२५-२६ हंगामात, ऑस्ट्रेलियाची सर्व आठ राज्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करतील आणि हे हंगामात प्रथमच पाहायला मिळेल.’