Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी

आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. असे करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 18, 2025 | 09:53 AM
IPL 2025: 'Hitman' dominates Wankhede Stadium! Rohit Sharma sets a big record in IPL history

IPL 2025: 'Hitman' dominates Wankhede Stadium! Rohit Sharma sets a big record in IPL history

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत ३३ सामने खेळवून झाले आहेत. या दरम्याने खेळाडूंकडून अनेक विक्रम देखील रचले गेले आहेत. आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर  मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला आहे.  कालच्या सामन्यांमध्ये मुंबई  इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजाचीचा निर्णय  घेतला. तर प्रथम  फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी  अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही खेळाडू फार मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरले. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.  या सामन्यात  मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून त्याच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

सामन्यादरम्यान, रोहितने मोहम्मद शमीच्या चेंडूवर डीप थर्ड मॅनवर एक जोरदार षटकार लगावत वानखेडे स्टेडियमवर त्याचा १०० वा षटकार पूर्ण केला. रोहित शर्मा आता वानखेडे स्टेडियमवर १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वानखेडेवर आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही.

हेही वाचा : क्रीडा संघटनांच्या कारभाराची होणार चौकशी! सर्वोच्च न्यायालय एक आयोग स्थापन करण्याच्या विचारात..

मुंबई इंडियन्सकडून प्रभावी पर्याय म्हणून आलेल्या रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक छोटी पण वेगवान खेळी केली. त्याने फक्त १६ चेंडूंचा सामना करत २६ धावा केल्या, ज्यात त्याने तीन शानदार षटकार मारले. तथापि, रोहितला आतापर्यंत या हंगामात कोणतीही मोठी खेळी साकारता  आलेली नाही.

एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

        खेळाडूंचे नाव               मैदानाचे नाव                                         षटकार 

  1. विराट कोहली             एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू             130
  2. क्रिस गेल                    एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू             127                  
  3. एबी डिविलियर्स          एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू             118                   
  4.  रोहित शर्मा                 वानखेडे स्टेडियम, मुंबई                            100
  5. कीरोन पोलार्ड             वानखेडे स्टेडियम, मुंबई                               85     

या कामगिरीसह, रोहित आयपीएलच्या इतिहासात एका विशिष्ट मैदानावर १०० किंवा त्याहून अधिक षटकार लगावणारा केवळ चौथाच  फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दिग्गजांनी केली होती. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिन्ही फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. तर वानखेडेवर किरॉन पोलार्डने ८५ षटकार मारले आहेत. वानखेडेवर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या बचावासाठी नितीश राणा मैदानात, म्हणाला, सुपर ओव्हरमधील ‘तो’ निर्णय योग्यच…

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

     खेळाडूंचे नाव               सामन्यांची संख्या                 षटकार 

  1. क्रिस गेल                           142                                 357
  2. रोहित शर्मा                        263                                286
  3. विराट कोहली                    258                                282
  4. एम.एस. धोनी                     271                                260
  5. एबी डिविलियर्स                  184                                251 

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित शर्मा २८६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या यादीत ख्रिस गेलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याने १४२ सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारलेया आहेत. रोहितनंतर या यादीत विराट कोहलीचा देखील समावेश आहे. विराट २८२ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनी २६० षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे आणि एबी डिव्हिलियर्स २५१ षटकारांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

Web Title: Ipl 2025 hitman rohit sharmas biggest record in ipl history at wankhede stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • Chris Gayle
  • IPL 2025
  • IPL records
  • MI vs SRH
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1
1

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी
2

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
3

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.