फोटो सौजन्य - IndianPremierLeague
मिचेल स्टार्क : आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे साखळी सामने हे 13 शिल्लक आहेत तर तीन सामने हे क्वालिफायरचे आणि एक फायनलचा सामना असे मिळून चार सामने खेळवले जाणार आहेत. 17 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यामध्ये लढत होणार आहे. आयपीएल स्थगित केल्यामुळे परदेशी खेळाडू हे त्यांच्या मायदेशात परतले होते पण आता पुन्हा त्यांना भारतामध्ये बोलवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे काही खेळाडू हे त्यांच्या राष्ट्रीय ड्युटीमुळे आयपीएलसाठी मिचेल स्टार्क भारतामध्ये येणार नाहीत. यामध्ये एक नाव म्हणजेच मिचेल स्टार्क. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्क याला दिल्ली कॅपिटल्सने ११.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण तो आता दिल्लीच्या उर्वरित सामन्यासाठी भारतामध्ये येणार नाही त्यामुळे मग त्याच्या पगारामध्ये घट होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत. आयपीएल जवळजवळ दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता मिचेल स्टार्क याने आयपीएलसाठी भारतामध्ये येण्यास नकार दिला आहे.
A setback for Delhi Capitals as Mitchell Starc opts out of the remainder of #IPL2025.
Follow live updates: https://t.co/5llwgp1Pkg pic.twitter.com/r0Vb2hSLHW
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 16, 2025
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या मालिकेत खेळणार आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू हे आयपीएल मध्ये खेळणार नाही. आता प्रश्न असा आहे की, हंगामाच्या मध्यात संघ सोडल्यामुळे मिचेल स्टार्कच्या पगारावर परिणाम होईल का? तर उत्तर हो आहे. cricket.com AU नुसार, जर दिल्ली संघ चालू हंगामात अंतिम फेरीत पोहोचला तर स्टार्कला त्याच्या आयपीएल २०२५ च्या पगाराचा एक तृतीयांश भाग द्यावा लागेल.
याचा अर्थ असा की जर डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्येच सोडला तर त्याला ३.९२ कोटी रुपये गमवावे लागतील. जर असे झाले तर स्टार्कला आयपीएल पगार म्हणून फक्त ७.८३ कोटी रुपये मिळतील. मिचेल स्टार्कने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. जर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तर त्यांना स्टार्कची उणीव नक्कीच जाणवेल. तो बाद फेरीत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता. त्याने गेल्या वर्षी केकेआरसाठी हे केले होते.
दिल्ली कॅपिटल्स ११ सामन्यांत १३ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. जर डीसीला प्लेऑफसाठी पात्र व्हायचे असेल तर त्यांना येथून किमान दोन सामने जिंकावे लागतील. जर संघाने तीनपैकी दोन सामने गमावले तर त्याला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.