IPL 2025: Vaibhav Suryavanshi's shock in the cricket world! He took the first place by leaving 58 batsmen behind..
IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ७० सामने खेळून झाले आहेत. १८ व्या हंगामात सर्वात जास्त चर्चा झाली ती वैभव सूर्यवंशी या खेळाडूची. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. राजस्थानकडून खेळताना या १४ वर्षीय युवा खेळाडूने ३५ चेंडूत १०० धावा काढून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अशातच त्याने आता जगातील ५८ फलंदाजांना मागे सारून पहिला क्रमांक पटकवला आहे. त्याबद्दल आपण माहिती घेऊया.
५८ फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशीने बाजी मारळिया आहे. त्या सर्व फलंदाजांनी आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने धुमाकूळ घातला आहे. खरं तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत शतक झळकावणाऱ्या फलंदाजांचा हा आकडा आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्व फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशी पहिल्या क्रमांकावर राहीला आहे.
हेही वाचा : IND Vs END : Shreyas Iyer सोबत जे घडले ते चुकीचेच! माजी खेळाडूच्या खुलाशाने खळबळ..
वैभव सूर्यवंशीने ५८ फलंदाजांना मागे टाकण्यात यश मिळवले आहे. आपण त्याने शतका दरम्यान मारलेल्या चौकारांच्या टक्केवारीबाबत बोलत आहोत. १४ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूचा सामना करत शतक झळकावले होते. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत २६५.७८ च्या स्ट्राईक रेटने १०१ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ७ चौकार आणि ११ षटकारांचा पाऊस पाडला होता. म्हणजेच, त्याने त्याच्या शतकात फक्त चौकारांनी ९४ धावा केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीने त्याच्या शतकादरम्यान त्याच्या ९३ टक्के धावा फक्त चौकार आणि षटकार मारून पूर्ण केल्याया आहेत. जो एक विक्रम ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने या बाबतीत त्याचा स्वतःचा संघ सहकारी यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडीत काढला आहे. २०२३ च्या आयपीएलमध्ये जेव्हा यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकले होते. तेव्हा त्याने ९० टक्के धावा या चौकारांनी पूर्ण केल्या होत्या.
हेही वाचा : IPL 2025 : IPL च्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रण! BCCI ने घेतला निर्णय..
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या जोडीनंतर श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. २००८ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शतकात त्याने ८९ टक्के धावा चौकार ठोकून पूर्ण केल्या होत्या. तर त्याच आयपीएल हंगामात, जेव्हा अॅडम गिलख्रिस्टने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकले होते तेव्हा त्याच्या ८८ टक्के धावा या चौकारांनी आल्या होत्या.