RCB ने उचलली 18 वर्षांनी आयपीएल २०१५ ची ट्रॉफी (फोटो सौजन्य - Instagram)
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज झाला आणि याबाबत आज जगभरात उत्सुकता लागून राहिली होती. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. मात्र १८ वर्षानंतर पहिल्यांदा RCB ने IPL 2025 चा चषक उंचावला. गेले १८ वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर विराटचे हे स्वप्नं पूर्ण झाले आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आरसीबीने पंजाबला १९१ धावांचे लक्ष्य दिले. त्यांनी २० षटकांत ९ गडी बाद १९० धावा केल्या. संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. रजत पाटीदारने २६, लियाम लिव्हिंगस्टोनने २५, जितेश शर्मा आणि मयंक अग्रवालने २४-२४ धावा केल्या. रोमारियो शेफर्डने १७ धावा आणि फिलिप साल्टने १६ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि काइल जेमिसनने ३-३ बळी घेतले. युजवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख आणि अझमतुल्ला उमरझाई यांनी १-१ बळी घेतले (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कृणालची कमाल
आरसीबीसाठी कृणाल पंड्याची खेळी खूपच निर्णयात्मक ठरली. त्याने पंजाबचे मुख्य बळी घेतले आणि तिथेच मॅच फिरली. अटीतटीच्या या सामन्यात प्रेक्षकांचाही कस लागलेला दिसून आला. अघदी शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना प्रचंड उत्कंठावर्धक झाल्याचे पहायला मिळाले.
यावेळी IPL ला एक नवीन विजेता मिळाला आहे. कारण आरसीबी आणि पंजाब त्यांच्या पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत होते. आजपर्यंत कधीही त्यांच्या वाट्याला यश आलेले नाही. अशा परिस्थितीत, हा सामना ठरल्याप्रमाणेच खूप रोमांचक झाला.
श्रेयसच्या विकटने बदलली परिस्थिती
पंजाब किंग्जला या सामन्यात श्रेयस अय्यरच्या रूपाने सर्वात मोठा धक्का बसला. या सामन्यात तो कर्णधारपदाची खेळी खेळू शकला नाही. अय्यर २ चेंडूत १ धावा काढून बाद झाला. रोमारियो शेफर्डच्या चेंडूवर जितेश शर्माने त्याचा झेल घेतला.
सर्वात मोठी विकेट
काय होती परिस्थिती
आयपीएल २०२५ मध्ये लीग फेरीनंतर, पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता. त्यांचे १४ सामन्यांमध्ये १९ गुण होते. आरसीबीने दुसरे स्थान मिळवले होते. इतक्या सामन्यांमध्ये त्यांचेही तेवढेच गुण होते, परंतु नेट रन रेटमध्ये पंजाबने विजय मिळवला. गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर होते.
पहिला क्वालिफायर सामना पंजाब आणि आरसीबी यांच्यात खेळला गेला. हा सामना जिंकून आरसीबीने थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. पराभवानंतर पंजाब संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला. एलिमिनेटर सामन्यात गुजरातला हरवून मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. तिथे पंजाबने त्यांचा पराभव केला आणि जेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. मात्र अखेर शेवटच्या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीने आपणच सरस असल्याचे दाखवत ट्रॉफी हिसकावून घेतली.