'या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक', भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खेळीवर संतापला
RCB vs PBKS IPL 2025 Final: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने मंगळवारी (३ जून) पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध ९ विकेटवर १९० धावा केल्या. मात्र अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ४३ धावा केल्या, परंतु त्यासाठी त्याने ३५ चेंडू घेतले. त्याने १२२.८६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटच्या या खेळीवर आता प्रतिक्रिया उमटत आहे.
याचदरम्यान आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण विराट कोहलीच्या या खेळीवर संतापला. त्याने नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक असल्याचे म्हटले. पठाणने कोहलीविरुद्ध पंजाब किंग्जच्या रणनीतीबद्दलही सांगितले. श्रेयस अय्यरच्या गोलंदाजांनी शॉर्ट आणि स्लो बॉलने कोहली फारसा टिकला नाही.
आयपीएलच्या या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०० पेक्षा कमी धावसंख्या करण्यात आले . मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-२ मध्ये २०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारली होती. पंजाब किंग्जने एक षटक शिल्लक असताना लक्ष्य गाठले. अशा परिस्थितीत, पहिल्यांदाच जेतेपद जिंकण्यासाठी आरसीबीचा धावसंख्या कमी ठरू शकतो.
They kept bowling short and slow balls to Virat Kohli. Strike rate of 123 after 35 balls on this pitch is disappointing.
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 3, 2025
आरसीबीकडून सलामीला आलेल्या कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावा काढल्या. तो १५ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा धावसंख्या ४ बळींसाठी १३१ धावा असा होता. अजमतुल्ला उमरझाईने स्वतःच्या चेंडूवर कोहलीचा झेल टिपला. यानंतर, कोहलीला लक्ष्य करत पठाणने एक्सवर लिहिले, “त्याने विराट कोहलीला सतत शॉर्ट आणि स्लो बॉल टाकले. या खेळपट्टीवर ३५ चेंडूंनंतर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक आहे.”
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ बाद १९० धावांवर रोखण्यात चांगली कामगिरी केली. पंजाब किंग्जकडून युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३७ धावांत १ बळी घेतला. काइल जेमीसनने ४८ धावांत ३ बळी घेतले. भारताचा आघाडीचा टी-२० गोलंदाज अर्शदीप सिंगने ४० धावांत ३ बळी घेतले. त्याने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले.