Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर Aggressive सेलिब्रेशन जेमिसनला पडलं महागात, प्रेक्षकांकडून ट्रोल; IPL ने केली कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे त्याच्यावर आयपीएल कारवाई सुरू झाली आहे. अशा पद्धतीने सेलिब्रेट करणं त्याला महागात पडलं आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 02, 2026 | 11:09 AM
जेमिसनला सेलिब्रेशन पडलं महागात (फोटो सौजन्य - X.com)

जेमिसनला सेलिब्रेशन पडलं महागात (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीची विकेट पडल्यावर केले भयानक सेलिब्रेशन 
  • काइल जेमिनसनला पडले महागात 
  • आयपीएलने केली कारवाई 
वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२६ मध्ये अत्यंत घातक बॅटर म्हणून सर्वांच्या समोर आलाय. अगदी दिग्गज बॉलरचीदेखील या संपूर्ण हंगामात वैभवने धुलाई केली आहे. त्यामुळे वैभवला आऊट केल्यानंतर प्रत्येक बॉलरला आनंद होत आहे. पण त्याचे सेलिब्रेशन नक्की कसे असावे हादेखील एक प्रश्न आहे. आता वैभवची विकेट काढल्यानंतर चुकीच्या पद्धतीने सेलिब्रेशन करणं बॉलरला चक्क त्रासदायक ठरलं आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला बाद केले. वैभवने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. न्यूझीलंडच्या जेमिसनने पुढच्याच चेंडूवर एक अप्रतिम यॉर्कर टाकला, ज्यामुळे वैभव निःशब्द झाला आणि त्रिफळाचीत झाला. विकेटनंतर जेमिसनने आक्रमकपणे जल्लोष केला. तो वैभवकडे गेला आणि मोठ्याने ओरडला, ज्यामुळे त्याच्यावर सर्वत्र टीका झाली. त्याचं हे असं करणं अत्यंत चुकीचे ठरले आहे. प्रेक्षकांचा रोष तर त्याने ओढवून घेतलाच पण त्यासह IPL ने देखील त्याच्यावर कारवाई केली आहे. 

DC Vs RR Live: दिल्लीने ‘रॉयल्स’ची उडवली दाणादाण; ओपनर्सने लावली वाट, 7 विकेट्सने पराभूत

जेमिसनवर आयपीएलची कारवाई

The celebration of Kyle Jamieson after dismissing Vaibhav Suryavanshi. pic.twitter.com/s6Otq9Uu0X — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2026

आयपीएलने काईल जेमिसनला त्याच्या आक्रमक जल्लोषाबद्दल ताकीद दिली आहे आणि त्याला एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे, “जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ४३ व्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज काईल जेमिसनला ताकीद देण्यात आली आहे.”

काईल जेमिसनने आपली चूक कबूल केली

काईल जेमिसनने आपली चूक कबूल केली आहे. आयपीएलच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “जेमिसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे, जे सामन्यादरम्यान आक्षेपार्ह भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे, ज्यामुळे दुसऱ्या खेळाडूकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकते. जेमिसनने आपली चूक कबूल केली आणि सामनाधिकारी राजीव सेठ यांनी लादलेली शिक्षा स्वीकारली.” 

दरम्यान वैभवने यावर कोणतीही प्रतिक्रिया ना मैदानात दिली ना मैदानाबाहेर. अनेकदा वैभव सर्व प्रतिक्रिया या त्याच्या खेळामार्फतच देत असतो. त्यामुळे आता पुन्हा दिल्लीसमोर राजस्थानचा संघ उभा ठाकला तर नक्की वैभवची बॅट कशी तळपणार हेच चाहत्यांना पहायचं आहे. 

DC Vs RR Live: फिनिशिंग टच म्हणजे काय? फरेराने दाखबलं! Riyan Parag ने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट

Web Title: Ipl 2026 kyle jamieson aggressive celebration after vaibhav sooryavanshi wicket ipl took action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • DC vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
1

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
2

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.