
IPL 2026: Time to sell RCB because of 'King' Kohli? 'That' report created a big stir; What is the real reason?
Will Royal Challengers Bangalore be sold? आयपीएल २०२५ मध्ये १८ व्या हंगामाचे जेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२६ मध्ये नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्याचे मालक डियाजिओकडून फ्रँचायझी विकण्यास रस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही आरसीबी संघांची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत ती पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयपीएल २०२६ पूर्वी आरसीबी विकण्याच्या डियाजिओच्या निर्णयावर आता एका अहवालामुळे प्रकाश पडला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीला संभाव्य कारणांपैकी एक म्हणून बोलले जात आहे.
सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एएमपी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे संस्थापक इंद्रनील दास ब्लाह यांनी म्हटले की, २०२५ पर्यंत जेतेपद जिंकले नसले तरी आरसीबी अव्वल तीन ब्रँडमध्ये राहिल्याचे कारण कोहली आहे. त्यांनी असे देखील म्हटले आहे की, विराट कोहलीची संभाव्य निवृत्ती, जी नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे. त्याचा निश्चितच फ्रँचायझीच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्याचे मालक लवकर बाहेर पडण्याच्या विचाराची शक्यता आहे. दरम्यान, इतर तज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की विराट कोहली निवृत्तीनंतर देखील काही प्रमाणात आरसीबीशी संबंधित राहू शकतो.
संघ मालक म्हणाले की, विराट कोहलीच्या लोकप्रियतेमुळे आरसीबीला शीर्ष तीन ब्रँडमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. जरी ते कोणतेही पदक नसले तरी. त्याची निवृत्ती, जेव्हाही होईल, तेव्हा त्याचा संघाच्या मूल्यांकनावर निश्चितच परिणाम होणार आहे. माजी कर्णधार विराट आयपीएल पदार्पणापासून आरसीबीचा पोस्टर बॉय आहे. तो कधी देखील दुसऱ्या फ्रँचायझीसाठी खेळला नाही आणि तो आरसीबीचा चेहरा बनला आहे. तज्ज्ञांकडून ई४एमला सांगण्यात आले आहे की कोहलीच्या निवृत्तीबाबत कोणत्याही हालचालीमुळे आरसीबीच्या दीर्घकालीन ब्रँड इक्विटीबद्दल अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ च्या विजेतेपदानंतर, आरसीबी सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे, त्याचे मूल्य २०२४ मध्ये २२७ दशलक्ष डॉलर्सवरून २०२५ मध्ये २६९ दशलक्ष डॉलर्स झाले, जे १८.५% वाढलेले आहे.
हेही वाचा : ‘मी टू बॉम्ब’ ने क्रीडा जगतात खळबळ! बांगलादेशातील महिला क्रिकेटपटूंचा लैंगिक छळ; विशेष समिती स्थापन
२०२४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय आणि २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय आणि आयपीएलमध्येच मैदानावर सक्रिय आहे. तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असून पुढील काही वर्षांत, कदाचित तीन किंवा चार हंगामात आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. तसेच विराट कोहलीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने १७ वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट करून २०२५ मध्ये जेतेपद जिंकले.