Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन

९३ धावांची स्फोटक खेळी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने केलेला जल्लोष चर्चेचा विषय बनला आहे. सामन्यानंतर वैभवने स्पष्ट केले की त्याचा जल्लोष अगदी सहज होता, पण ड्रेसिंग रूममध्ये त्याने खरी कहाणी उघड केली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 20, 2026 | 10:24 AM
वैभव सूर्यवंशीने सांगितले सेलिब्रेशनमागील अर्थ (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीने सांगितले सेलिब्रेशनमागील अर्थ (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीचा युनिक जल्लोष 
  • मैदानावर पन्नास धावा पूर्ण केल्यावर नक्की असे का केले? 
  • ड्रेसिंग रूममध्ये केले स्पष्ट 
IPL 2026 च्या RR vs LST सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९३ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. वैभवने आपल्या खेळीत केवळ ३८ चेंडूंचा सामना केला, ज्यात १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. जेव्हा त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा त्याने एका अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.

सामन्यानंतर त्याला त्याच्या सेलिब्रेशनबद्दल विचारले जाणे स्वाभाविक होते. आणि नेमके तसेच घडले. जेव्हा वैभव ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला, तेव्हा त्याने आपल्या सेलिब्रेशनबद्दल सांगितले की तो फक्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यावर त्याने आपल्या सेलिब्रेशनमागील खरे सत्य उघड केले. वैभवने जगासमोर अगदी सहजपणे केलं असंच सांगितलं पण त्यामागची नक्की भावनिकता काय होती हे त्याने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या माणसांसमोर सांगितले. 

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव

वैभवचे हे सेलिब्रेशन त्याच्या आईसाठी

Always a mumma’s boy 💗 pic.twitter.com/k3X7HVEXTA — Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 19, 2026

आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, वैभवने दोन्ही हातांनी ‘A’ ची खूण केली. जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरने ड्रेसिंग रूममध्ये वैभवला त्याच्या सेलिब्रेशनबद्दल विचारले, तेव्हा त्याने सुरुवातीला ते वैयक्तिक असल्याचे सांगितले, पण लगेचच खुलासा केला की त्याचे सेलिब्रेशन त्याच्या आईसाठी होते. त्याच्या आईचे नाव ‘ए’ या अक्षराने सुरू होते. वैभव सूर्यवंशीच्या आईचे नाव आरती आहे. त्यामुळे, त्याने ‘ए’ चे चिन्ह करून आपली खेळी तिला समर्पित केली. वैभवने आपल्या मुलाखतीमध्ये याआधी स्पष्ट केले होते की, आपल्या आईने आपल्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. केवळ २-३ तास झोप तिला मिळत असे पण ती फक्त आपल्या खेळासाठी कष्ट घेत राहिली. 

वैभव सूर्यवंशी ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी 

लखनौविरुद्धच्या ९३ धावांच्या खेळीसह वैभवने ऑरेंज कॅपही जिंकली. या मोसमात १३ सामन्यांमध्ये वैभवच्या ५७९ धावा झाल्या आहेत. २३६.६२ च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो लखनौच्या मिचेल मार्शच्या मागे आहे. मार्शने १३ सामन्यांमध्ये ५६३ धावा केल्या आहेत. पहिल्या पाचमध्ये, सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन ५५५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ५५४ धावांसह चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचा कर्णधार शुभमन गिल ५५२ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Web Title: Ipl 2026 vaibhav sooryavanshi celebration on field after 50 expressed feeling in dressing room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs LSG
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव
1

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज
2

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
3

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?
4

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.