LSG Vs RR Live Streaming (फोटो- ians)
मिशेल मार्श आणि जोश इंग्लिसची शानदार खेळी
लखनौने राजस्थानला दिले 221 रन्सचे टार्गेट
राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफच्या आशा अद्याप जिवंत
Tata IPL 2026 RR Vs LSG Live: आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये महत्वाचा सामना पार पडला. आयपीएलच्या साखळी सामन्यातील हा अत्यंत महत्वाचा सामना समजला जात होता. राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौने प्रथम 220 रन्स करून राजस्थानला 221 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक आणि शानदार खेळी केली आहे. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पुढील सामना राजस्थानने जिंकल्यास ते टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकतात. मात्र पराभव झाल्यास दुसऱ्या संघांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
लखनौने दिलेल्या 221 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात खेळण्यासाठी उतरले. दोघांनी पॉवरप्ले मध्ये 71 रन्स लुटल्या. चांगली सुरुवात राजस्थानला करून दिली. मात्र कर्णधार यशस्वी जयस्वाल 11 रन्स करून आउट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात खेळण्यासाठी आला. वैभव सूर्यवंशीने शानदार आणि आक्रमक खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 38 बॉलमध्ये 93 रन्सची खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक अशी खेळी केली. ध्रुव जुरेलने देखील अर्धशतकी खेळी केली.
लखनौची गोलंदाजी
लखनौकडून डावाची सुरूवात आकाश महाराज सिंगने केली. पॉवर प्लेमध्ये लखनौला एकही देखील विकेट मिळवता आली नाही. मात्र अखेर आकाश महाराज सिंगने कर्णधार यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. मोहसीन खानने वैभव सूर्यवंशीला आउट केले.
Scorching FIFTY for Vaibhav Sooryavanshi ⚡️ How many times have we heard this in the season? 😅 Updates ▶️ https://t.co/LvQzM3tl06 #TATAIPL | #KhelBindaas | #RRvLSG | @rajasthanroyals pic.twitter.com/Hgoh4n3QIe — IndianPremierLeague (@IPL) May 19, 2026
लखनौची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जयस्वालने लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जोश इंग्लिश हे खेळण्यासाठी मैदानात उतरले. या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 8 ओव्हर्सपर्यंत मार्श आणि इंग्लिश यांनी जबरदस्त भागीदारी केली. मात्र 9 व्या ओव्हर्समध्ये जोश इंग्लिश आउट झाला. जोश इंग्लिशने 60 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली.
त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. पूरन 16 रन्स करून आउट झाला. तर मिशेल मार्शने आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंत 35 रन्सवर असताना रन आउट झाला. मिशेल मार्श 4 रन्स आपल्या शतकापासून दूर राहिला आहे. तो 96 रन्स करून आउट झाला.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करत असलेल्या इंग्लिसला यश राजने आउट केले. यश राजने निकोलस पूरनला आउट करून लखनौला दुसरा धक्का दिला.
राजस्थान रॉयल्सचा संघ: राजस्थान रॉयल्स, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनाव्हन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यश राज पुंज, ॲडम मिल्ने, रवी बिश्नोई, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर.
LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
लखनौ सुपर जायंट्सचा संघ: मिचेल मार्श, हिंमत सिंग, रिषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्करम, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव.






