Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Who is Salil Arora: वडिलांनी घर चालविण्यासाठी सोडले क्रिकेट, मुलगा गाजवतोय मैदान; कोण आहे सलील अरोरा?

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २४४ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला. अखेरीस २३ वर्षीय सलील अरोरानेही आपली छाप सोडली. सनरायझर्सचे हे नवीन वादळ कोण आहे?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 30, 2026 | 12:52 PM
सलील अरोरा कोण आहे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सलील अरोरा कोण आहे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सनरायझर्स हैदराबादचा सलील अरोरा आहे कोण
  • वडिलांनी अर्धवट सोडलं क्रिकेटचं स्वप्नं मुलाने केलं पूर्ण 
  • सलील अरोराना आणली विजयश्री खेचून 
जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. अगदी अनुभवी फलंदाजसुद्धा त्याच्याविरुद्ध सावधपणे खेळतात. त्यामुळेच बुमराहवर वर्चस्व गाजवणारा फलंदाज क्वचितच दिसतो. मात्र, आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सनरायझर्स हैदराबादने त्याला धूळ चारली. बुमराहने चार षटकांत ५४ धावा दिल्या आणि एकही बळी घेण्यात तो अपयशी ठरला. याच काळात, सनरायझर्सच्या सलील अरोराने यॉर्करवर नो लुक सिक्स मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चला जाणून घेऊया, सनरायझर्सचे हे २३ वर्षीय नवीन वादळ कोण आहे.

सनरायझर्सचे नवीन वादळ, सलील अरोरा कोण आहे?

यष्टीरक्षक फलंदाज सलील अरोरा पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी आहे. ७ नोव्हेंबर २००२ रोजी जन्मलेल्या सलीलच्या वडिलांचा अमृतसरमध्ये एक छोटा व्यवसाय आहे. त्याचे वडील, राकेश अरोरा, हे देखील एक माजी क्रिकेटपटू आहेत. त्याचे वडील जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळत होते, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी क्रिकेट अर्धवट सोडून व्यवसाय स्वीकारला. मात्र, त्यांच्यातील क्रिकेटपटू जिवंत राहिला. त्यामुळे जेव्हा सलीलचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचा निर्णय घेतला.

IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला ‘नको’ तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया

वडिलांचे अपूर्ण स्वप्न करतोय पूर्ण 

सलील आता आपल्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करत आहे. त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप संघर्ष केला आणि सलीलचे यश हे त्याच्या वडिलांच्या त्यागाचे फळ मानले जाते. सलील हा पंजाबच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अवघ्या ३९ चेंडूंमध्ये शतक झळकावून खळबळ माजवल्यानंतर सलील पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. 

सलीलने ४५ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि ९ चौकारांसह १२५ धावा केल्या. याच खेळीनंतर सनरायझर्स हैदराबादने त्याची दखल घेतली. आयपीएल २०२६ मध्ये, सलील ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीवर आला होता आणि सनरायझर्स हैदराबादने त्याला १.५० कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबई इंडियन्सनेही लिलावात सलीलसाठी मोठी बोली लावली.

सलीलने बुमराहच्या गोलंदाजीवर मारली नो लुक सिक्स 

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात, सलील अरोराने सनरायझर्ससाठी १० चेंडूंमध्ये ३० धावांची धडाकेबाज खेळी करून खळबळ उडवून दिली. या खेळीत सलीलने तीन षटकार आणि दोन चौकार मारले. त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक शानदार न बघता षटकारही मारला. बुमराहच्या गोलंदाजीवर एखाद्या फलंदाजाने असा न बघता षटकार मारणे दुर्मिळ आहे.

इतकेच नाही, तर डावाच्या १९व्या षटकात सलील अरोराने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला अक्षरशः धुवून काढले आणि त्याच षटकात त्याने संघासाठी विजयी फटका मारला. हार्दिकच्या त्या षटकात सलीलने दोन षटकार आणि एक चौकार ठोकून सनरायझर्सला आठ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकून दिला. यामुळेच सलीलचे नाव चर्चेत आले आहे. बुमराहला अशा पद्धतीने सिक्स मारणे खरं तर कठीण आहे. त्यामुळे सलीलचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान

Web Title: Ipl 2026 who is salil arora hit no look sixers to jasprit bumrah know his struggle for playing cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs MI
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला ‘नको’ तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया
1

IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला ‘नको’ तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया

SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान
2

SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान

MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज
3

MI Vs SRH Live: मुंबईचा नवा ‘सिंघम’! रिकल्टनची मलई अन् ‘एसआरएच’ची धुलाई, हैदराबादला 244 रन्सची गरज

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…
4

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.