MI Vs SRH Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
थोड्याच वेळात सुरू होणार मुंबई विरुद्ध एसआरएच सामना
मुंबई पलटणसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचे 5 पराभव
Tata IPL 2026 MI Vs SRH Live Updates: थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स सामना सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी आजचा आणि यापुढील सर्व सामने जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करता आलेली नाही. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजी प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आरसीबीविरुद्ध रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो खेळत नसल्याने मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र तो आज देखील खेळू शकला नाही तर, मुंबईची डोकेदुखी वाढू शकते.
20 दिवसानंतर ‘Hitman’ मैदानावर उतरणार का? सनराझर्स हैदराबादविरूद्ध तळपणार का रोहित शर्माची बॅट
रोहितच्या जागी क्विंटन डी कॉकने आतापर्यंत समाधानकारक खेळ केला आहे. युवा फलंदाज दानिश मालेवार याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आलेला नाही. त्यामुळे आज नमन धीरला संधी दिली जाऊ शकते. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात नमन धीरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईची चिंता वाढली आहे.
हैदराबादविरूद्ध तळपणार का रोहित शर्माची बॅट
रोहितच्या अनुपस्थितीत, मुंबई इंडियन्सने सलामीच्या विविध संयोजनांचे प्रयोग केले आहेत. संघाला योग्य संतुलन साधण्यात अपयश आले आहे आणि आघाडीची फळी सातत्याने संघर्ष करत आहे. दानिश मलेवारच्या धावांच्या कमतरतेमुळे रोहितची अनुपस्थिती अधिकच जाणवत आहे.
काय आहे वानखेडे स्टेडियमचा पीच रिपोर्ट काय?
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. इथली बाउंड्री लहान असल्यामुळे आणि खेळपट्टीत नैसर्गिक बाऊन्स त्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे जास्त सोपे समजले जाते. त्यामुळे टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
IPL 2026: वानखेडेवर रंगणार अस्तित्वाची लढाई! MI पलटण करणार ‘हे’ बदल? काय आहे प्लेइंग 11
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रोमारिओ शेफर्ड / केशव महाराज, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक.
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, ईशान कलिंगा, साकीब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.






