मुंबईने केले 13 खेळाडू रिलीज (फोटो- सोशल मिडिया)
आयपीएलच्या 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व १० संघांनी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघ मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला, तर सनरायझर्स हैदराबादने स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला रिलीज करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर मुंबई इंडियन्सने देखील तब्बल 13 खेळाडू रिलीज केले आहेत.
आगामी हंगामाच्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सने तब्बल १३ खेळाडूंना संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत न्यूझीलंडचा अनुभवी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचे नाव देखील आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का व्यक्त केला जात आहे. मुंबई इंडियन्समे आपल्या संघात मोठी खांदेपालट केल्याचे दिसून येत आहे.
1️⃣6️⃣ Locked, 9️⃣ left to pick! Paltan, tell us your picks to complete our squad at the #TATAIPLAuction 👇 #TATAIPLRetention https://t.co/0eIutECR8c — Mumbai Indians (@mipaltan) November 17, 2026
मुंबई इंडियन्सने ज्या १३ खेळाडूंना रिलीज केले आहे, त्यामध्ये ट्रेंट बोल्ट हे सर्वात मोठे नाव आहे. मुंबईच्या व्यवस्थापनाने बोल्टला १२.५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र आगामी लिलाव होण्यापूर्वी मोठी रक्कम मोकळी करण्यासाठी आणि नव्याने संघ उभा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
बोल्टच्या व्यतिरिक्त दीपक चाहर आणि युवा फिरकीपटू गझनफर यांना देखील मुंबई इंडियन्सने रिलीज केले आहे. तसेच मुंबईतून बाहेर पडलेल्या इतर खेळाडूंमध्ये रीस टॉपली, केशव महाराज, महिपाल लोमरोर, मयंक मार्कंडे, विष्णू विनोद, राज अंगद बावा, शिवालिक शर्मा, अथर्व अंकोलेकर आणि सत्यनारायण राजू या खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला देखील मुक्त केल्याचे समोर आले आहे. आता पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. तसेच आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवची नावे देखील चर्चेत आहेत.
Ans: आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने तब्बल 13 खेळाडूंना रिलीज केले आहे.
Ans: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.






