'Preity Zinta is the reason I got the Player of the Match award..', 'this' fast bowler in IPL made a shocking revelation...
Sandeep Sharma Reveals About Preity Zinta : पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन संघात आयपीएल 2025 चा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पंजाबचा पराभव करून आयपीएलचे विजेतपद जिंकले होते. या हंगामात श्रेयस अय्यरच्या शानदार नेतृत्वात पंजाब किंग्सने अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु अंतिम विजेतेपद मात्र मिळवता आले नाही. दरम्यान प्रीति झिंटा मात्र आपल्या खेळाडूंचे कौतुक केले होते. क्रिकेटपटू संदीप शर्मा याने आता अशातच प्रीति झिंटाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, प्रीति झिंटामुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलण्यात आला होता.
नेमकं काय म्हणाला संदीप शर्मा?
संदीप शर्माने एका मुलाखतीत सांगितलं की, एक आयपीएल सामना बंगळुरुमध्ये खेळवण्यात आला होता. त्यावेळी सामन्यानंतर प्रीति झिंटाने रवि शास्त्रींना सांगून प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलायला लावला होता. संदीप शर्मा म्हणाला की, “बंगळुरुमध्ये एका आयपीएल सामन्यामध्ये मी नव्या चेंडूने तीन विकेट चटकावल्या होत्या. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या महत्वाच्या फलंदाजा बाद केले होते. पण या सामन्यात अक्षर पटेलला प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी घोषित करण्यात येणार होते. कारण त्याने दोन विकेट आणि 25 धावा देखील काढल्या होत्या. पण प्रीति मॅमकडून रवि शास्त्री यांना सांगण्यात आले की सँडी प्लेयर ऑफ द मॅच सँडी असेल.”
संदीप शर्माकडून प्रीति झिंटासोबत श्रेयस अय्यरबाबतदेखील खुलासा करण्यात आला. त्याने सांगितलं की, कोणत्या संघाला आयपील अंतिम फेरीत पोहोचवण्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही भारतीय संघाचे कर्णधार बनाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक वेगळं आव्हान असतं. संदीप शर्मा श्रेयस अय्यरबाबत सांगितले की, “श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण की त्याने आयपीएलमध्ये संघाला अंतिम फेरीत नेऊन पोहोचवलं होतं. पण असं म्हणणं फार चुकीचं आहे. सूर्यकुमार यादव कोणत्याही आयपीएल संघाचं कर्णधारपद भूषवत नाही. म्हणजेच तसा काही एक मुद्दाच येत नाही. भारतीय संघ एक खूप वेगळी टीम असून लोकांना ही गोष्ट समजायला हवी.”
हेही वाचा : SA vs ENG : ‘आता पुढचा मार्ग कठीण..’, एकदिवसीय सामन्यात विक्रम रचणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झला सतावतेय चिंता
संदीप शर्माने भारताकडून फक्त दोन टी20 सामने खेळलेला आहे. तर आयपीएलमध्ये तो तीन संघांसाठी त्याने प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 146 विकेट घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 8.06 इतका प्रती षटक आहे.