मॅथ्यू ब्रीट्झके(फोटो-सोशल मीडिया)
Matthew Breitz is worried : दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या एकदिवसीय सामन्यातील पदार्पणापासून खेळलेल्या पाच डावांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. ब्रीट्झके एकदिवसीय सामन्यातील पहिल्या पाच डावांमध्ये अर्धशतक झळकवणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. यासह, तो पहिल्या पाच डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७७ चेंडूत ८५ धावांची तुफानी पारी खेळली. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ८ गमावून गमावत ३३० धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ३२५ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने ५ धावांनी विजय मिळवला. मॅथ्यू ब्रीट्झकेने आतापर्यंत ९२.६० च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत.
मॅथ्यू ब्रीट्झकेने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची खेळी साकारली. त्यानंतर त्याने ८३, ५७ आणि ८८ धावांच्या खेळी खेळल्या आहेत. मॅथ्यू ब्रीट्झके त्याच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ८५ धावा काढून अनेक विक्रमांची नोंद केली. ब्रिट्झकेने मस्करी करत म्हटले की, त्याची सुरुवात खूप चांगली झाली असून त्यामुळे आता पुढचा मार्ग थोडा कठीण असण्याची शक्यता आहे. तो असे देखील म्हणाला की त्याला आशा आहे की भविष्यात देखील त्याचा चांगला फॉर्म कायम असणार आहे. पण तो फक्त १५ धावांनी शतक झळकावू शकला नाही याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. अन्यथा त्याचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर लिहिण्यात आले असते.
ब्रीट्झके पुढे म्हणाला की, पुढचा मार्ग खाली जाण्याची भीती वाटते आहे. आतापर्यंतची सुरुवात खूप खास राहिली आहे. “मी चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळलो आहे आणि भविष्यात देखील सर्वकाही चांगलेच राहावे अशी मी प्रार्थना करत आहे. खरे सांगायचे तर, मी शतक झळकावू शकलो नाही याबद्दल मी खूप नाराज झालो होतो, कारण लॉर्ड्सच्या बोर्डवर माझे नाव असणे खरोखरच विशेष राहिली असते.”
मॅथ्यू ब्रीट्झकेकडून कबूल करण्यात आले की, सतत सामने खेळल्यामुळे त्याला थकवा जाणवू लागला आहे. परंतु व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल तो त्याबाबत कृतज्ञ आहे. तो म्हणतो की, “कधीकधी या सर्व गोष्टींमुळे तो खूप थकून जातो. पण मी याकडे अशा प्रकारे पाहत असतो की क्रिकेटसारख्या खेळाला माझा व्यवसाय बनवल्याबद्दल मी खूप भाग्यवान असून मी प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण हे सर्व कायमचे टिकणारे नाही.”