IPL: Sanju Samson to leave RR! Request to team management to release him..
IPL : भारतीय क्रीडा विश्वातून एक मोती बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनने आता राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे. संजू सॅमसनकडून राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला आयपीएल २०२६ पूर्वी आपल्याला सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. संजू सॅमसनने व्यवस्थापनाला त्याची देवाणघेवाण करण्यास किंवा त्याला सोडण्याची विनंती केली आहे.
क्रिकबझच्या एका अहवालानुसार, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनात बरेच मतभेद निर्माण झाले आहेत. परिस्थिती इतकी टोकाला गेली आहे की, संघाचा कर्णधार सॅमसनकडून स्वतःला दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्याची किंवा त्याला लिलावात ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहवालात असे देखील म्हटले आहे की, संजू सॅमसनच्या कुटुंबीयाकडून देखील सांगण्यात आले आहे की, तो आता या संघासोबत खेळण्यास इच्छूक नाही. त्याचे काही जवळचे खेळाडू (जे आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात) असेही म्हणतात की सॅमसन आणि संघातील संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला १८ कोटींना कायम ठेवले होते. या हंगामात संजू सॅमसनने ९ सामन्यांमध्ये अर्धशतकाच्या मदतीने २८५ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा तो खेळाडू देखील आहे.
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी १४९ सामने खेळले आहेत. त्याच वेळी, त्याने या काळात संघासाठी सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत. संजू सॅमसनने १४९ सामन्यांमध्ये ४०२७ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये सॅमसनला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांत त्याने एकूण ६७ सामने कर्णधारपद भूषवले. त्यापैकी तो ३३ सामने जिंकण्यात यशस्वी झाला.
बुधवारच्या टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तात म्हटले आहे की, राजस्थान रॉयल्स संघ सध्या संजू सॅमसन किंवा इतर कोणत्याही खेळाडूला दुसऱ्या संघात पाठवण्याचा विचारात नाही. एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, राजस्थान रॉयल्सने सध्या सॅमसन किंवा इतर कोणत्याही खेळाडूची देवाणघेवाण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सॅमसन हा संघाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो संघाचा वादग्रस्त कर्णधार आहे.
सॅमसनला पहिल्यांदा २०१२ मध्ये केकेआरकडून करारबद्ध करण्यात आले होते. परंतु, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर तो आरआर संघात सामील झाला आणि पंजाब किंग्ज (तेव्हाचे किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. आरआरच्या दोन हंगामांच्या निलंबनानंतर सॅमसन दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्यापूर्वी तो चार हंगाम संघात राहिला आहे. आयपीएल २०१८ च्या लिलावात आरआरकडून त्याच्या १८ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर त्याची पुन्हा संघात निवड केली आणि त्याला तीन वर्षांनंतर सॅमसनला संघाची धुरा सोपवली.