
जादुमणी सिंगने बॉक्सिंगमध्ये जिंकले रौप्यपदक
ग्लास्गो स्कॉटलंड येथे सुरू आहे कॉमनवेल्थ गेम्स
अंतिम सामन्यात जादुमणीने लावली जिवाची बाजी
Commonwealth Games 2026: सध्या ग्लास्गो स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी कमाल केली आहे. भारतीय मुष्टीयुद्ध प्रकारात जादुमणी सिंगने मंदेंगबाम याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. पुरुष बॉक्सिंग प्रकारात जादुमणीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या बॉक्सिंगपटूंनी आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे.
जादूमणी सिंगने 55 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात अत्यंत चांगला खेळ केला. मात्र त्याला विजयश्री खेचून आणण्यात अपयश आले. त्यामुळे जादुमणी सिंगने सिल्व्हर म्हणजेच रौप्य पदक जिंकले आहे. सामना पराभूत झाला असला तरी जादुमणीने अत्यंत चेंज प्रदर्शन केले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गोल्ड मेडल जिंकण्यासाठी त्याने जिवाची बाजी लावली. मात्र त्याला अपयश आले.
India vs Sri Lanka: आईशपथ! दौऱ्यापूर्वी अचानक बदलले शेड्युल, आता 3 दिवस होणार Warm Up सामना
अंतिम सामन्यात जादुमणीने चांगला खेळ केला . मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॉक्सरविरुद्ध त्याला अंतिम सामना जिंकता आला नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने बाजी मारत गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. अखेरच्या क्षणापर्यंत सुवर्णपदकासाठी लढणाऱ्या जादूमणिला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे.
Watch: Boxer Jadumani (55kg), who won the silver medal at the Commonwealth Games 2026, says, “I gave my all in this competition to win gold, but there were some shortcomings. I will work on those and overcome them, and in the upcoming Asian Games, I will bring a gold medal for… pic.twitter.com/N9UKDr14dG — IANS (@ians_india) August 1, 2026
कॉमनवेल्थ गेम्समध्ये जादुमणी सिंगने 55 किलो वजनी गटात रौप्यपद जिंकत भारताचा मान उंचावला आहे. जादुमणी या आधी 50 किलो वजनी गटात खेळत असेव तिथे देखील त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र ऑलिंपिक आणि कॉमनवेल्थमध्ये खेळण्यासाठी त्याने 5 किलो वजन वाढवले आणि 55 किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला.
जादुमणी सिंगला फुटबॉल क्षेत्रात आपले करियर करायचे होते. त्याचे बालपण मणिपूरमधील इम्फालजवळील इरोईशेम्बा या छोट्याशा गावातील जादुमणीचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे नव्हते. जादुमणी हा लहानपणापासून ब्राझीलच्या नेमार या फुटबॉलपटूचा चाहता होता. तो तासन्तास मैदानावर असेच. तो घरच्यांची नजर चुकवून मैदानावर खेळण्यासाठी जात असे असे समजते आहे.