
Jammu Kashmir : काश्मीरमध्ये सायकलिंगचा जल्लोष! 3 हजार सायकलस्वारांचा सहभाग
खेळ, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांच्या वतीने ‘पॅडल थ्रू पॅराडाइज सायकल रेस 2026’चे आयोजन करण्यात आले. डल लेक ते हरवान मार्गावर झालेल्या या सायकल स्पर्धेत सुमारे तीन हजार सायकलस्वारांनी सहभाग घेतला. पोलीस अतिरिक्त महासंचालक (सशस्त्र) नितेश कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.
या स्पर्धेत विविध क्षेत्रांतील नागरिकांसह लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. सायकलिंगच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, मानसिक ताण कमी करणे आणि तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
स्पर्धेत सहभागी झालेल्या उमर हसन यांनी सांगितले की, या उपक्रमात विविध वयोगटातील आबालवृद्धांपासून लहान मुलांनीही सहभाग घेतला. आपण नियमितपणे सायकलिंग करत असून, स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि भविष्यात सायकलिंगमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
कामाचा व्याप आणि व्यस्त दिनक्रम बाजूला ठेवून गेल्या एक-दोन दिवसांपासून स्पर्धेची तयारी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शारीरिक हालचाल किंवा कोणताही खेळ माणसाला दैनंदिन ताणतणावापासून दूर ठेवण्यास मदत करतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने
‘पॅडल पुशर’ समूहाचे सदस्य साहिद राही यांनी अशा स्पर्धांचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सायकलिंगसारख्या उपक्रमांमुळे नैराश्य, तणाव आणि अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक प्रेरणा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
मोहम्मद रफान यांनीही स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे सांगितले. सरकारने अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कांगारुंसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात Steve Smith करणार पुनरागमन
स्पर्धक जुल्फिकार अली यांच्या मते, अशा स्पर्धांमुळे तरुणांना आपली शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळते. लहान मुलांनाही अशा उपक्रमांतून प्रेरणा मिळू शकते. सायकलिंग स्पर्धा पाहून मुलांना भविष्यात सायकलिंग किंवा अन्य क्रीडा प्रकारांत करिअर करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ईशा बशीर यांनी तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. खेळ ही सकारात्मक सवय असून, अशा उपक्रमांमुळे तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या या उपक्रमातून सायकलिंग, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. अशा स्पर्धांचे नियमित आयोजन झाल्यास तरुणांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.
Ans: जम्मू-काश्मीर पोलिसांनी या सायकल स्पर्धेचे आयोजन केले.
Ans: या स्पर्धेत सुमारे तीन हजार सायकलस्वारांनी सहभाग घेतला.
Ans: श्रीनगरमधील डल लेक ते हरवान मार्गावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.