Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

नालासोपारा येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास करताना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील पाशमैलाराम, पटनचेरू परिसरात मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 05:08 PM
नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक

Follow Us
Follow Us:
  • तेलंगणात अवैध कारखाना उद्ध्वस्त
  • ४४ किलो रासायनिक पावडर जप्त
  • ड्रग्ज प्रकरणात २५ आरोपींना अटक
भाईंदर : नालासोपारा येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास करताना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील पाशमैलाराम, पटनचेरू परिसरात मोठी कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी नियंत्रित रासायनिक पावडर तयार करणारा अवैध कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत ४४ किलो ६९९ ग्रॅम रासायनिक पावडर, अन्य केमिकल आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगर परिसरात दोन तरुणांकडून ११२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. अविनाश ऊर्फ सोन लोकनाथ अय्यर (वय २२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (वय २३) यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची किंमत अंदाजे ३ लाख ३६ हजार रुपये होती. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी सुरू असलेले दोन अवैध कारखाने उघड करून उद्ध्वस्त केले. या कारवाईत आतापर्यंत ६९ किलो ८७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, सुमारे २६० लिटर केमिकल आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी या प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक केली. त्यानंतर एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2-Bromo-4-Methylpropiophenone या रासायनिक पावडरचा पुरवठा तेलंगणातून होत असल्याची माहिती समोर आली. रमेश बाबू साके हा आरोपी पाशमैलाराम, पटनचेरू येथील औद्योगिक परिसरात ही रासायनिक पावडर तयार करून पुरवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी तेलंगणात छापा टाकून रमेश बाबू साके याला ताब्यात घेतले. त्याचबरोबर संबंधित कारखाना उद्ध्वस्त करून अंदाजे २७ लाख ६ हजार ७०० रुपये किमतीची ४४ किलो ६९९ ग्रॅम रासायनिक पावडर, इतर केमिकल आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त केले. या कारवाईत सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील पटनचेरू पोलिसांनी सहकार्य केले.

या प्रकरणात एमडी ड्रग्ज तयार करणारे, त्यासाठी लागणारी रसायने व प्रयोगशाळेतील साहित्य पुरवणारे, अंमली पदार्थांची तस्करी करणारे, विक्री करणारे आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे अशा विविध स्तरांवरील एकूण २५ आरोपींना नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव तसेच गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथून अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

हे सुद्धा वाचा : आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: तेलंगणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील पाशमैलाराम, पटनचेरू परिसरात एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी रासायनिक पावडर तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त केला.

  • Que: या कारवाईत किती मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: पोलिसांनी ४४ किलो ६९९ ग्रॅम रासायनिक पावडर, इतर केमिकल आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त केले. या रासायनिक पावडरची किंमत अंदाजे २७ लाख ६ हजार ७०० रुपये आहे.

  • Que: एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली?

    Ans: या प्रकरणात आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा येथून सुरू झालेल्या तपासात गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथील अवैध कारखाने उघडकीस आले.

Web Title: The police have dismantled a factory producing chemicals used for the manufacture of md drugs nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Arrested News
  • Drugs
  • Drugs Case

संबंधित बातम्या

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
1

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार
2

शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.