फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जसप्रीत बुमराह : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या कामगिरीने चाहत्यांची मन जिंकत असतो. त्याने त्याच्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. तो त्याच्या चमकदार गोलंदाजीने चाहत्यांची मनात घर केलं आहे. जूनमध्ये झालेल्या T२० विश्वचषकामध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती, सध्या विश्वचषकानंतर जसप्रीत बुमराह विश्रांती घेत आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या मालिकेमध्ये सुद्धा तो संघाचा भाग नव्हता. भारताच्या संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा बुमराहने केलेल्या गोलंदाजांनी गमावलेला सामना संघाने मिळवून दाखवला. त्याने असे अनेक चमत्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहेत. आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत यामध्ये जसप्रीत बुमराहला भरभरून प्रेम दिले जात आहे.
चेन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये जसप्रीत बुमराह सहभागी झाला होता. या कार्यक्रमामध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले. क्रिकेटचे चाहते त्याचबरोबर क्रिकेटला पसंत करणारे खेळाडू जगभरामध्ये आहेत. भारताच्या गोलंदाजांबद्दल फार कमी बोललं जात परंतु मागील काही वर्षांपासून जसप्रीत बुमराह या नावाचं वादळ जगभरामध्ये पसरलं आहे. जसप्रीत बुमराहचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून याचा अंदाज येऊ शकतो. धोनीवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चेन्नईनेही बुमराहला भरभरून प्रेम दिले आहे. जसप्रीत बुमराहचे महाराजाप्रमाणे मनापासून स्वागत करण्यात आले, त्याला मुकुट आणि फुलांचा हार घालण्यात आला. चेन्नईचे हृदय फक्त थलासाठी धडधडत असले तरी बुमराहचे स्वागत करण्यात कोणतीही कमतरता नव्हती.
The reception Jasprit Bumrah got in Chennai. 🤯
– Easily the most celebrated bowler in India. 🇮🇳 pic.twitter.com/3H7oEQIdIz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 27, 2024
सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने जसप्रीत बुमराहला फ्रेशर्स डे सेलिब्रेशनसाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जसप्रीत बुमराह चेन्नईला गेला होता. यावेळी त्यांचे तेथे भव्य स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ जसप्रीत बुमराहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, गर्दीची ऊर्जा आणि उत्साह यामुळे ते खरोखरच अविस्मरणीय झाले.