
जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत (Photo Credit - X)
बुमराहला मोठी विक्रम करण्याची संधी
बुमराहने या सामन्यात फक्त एक विकेट घेतल्यास तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करेल. विशेष म्हणजे, टी-२० मध्ये १०० बळी पूर्ण करताच तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये (Test, ODI, T20) १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनेल.
टी-२० मध्ये १०० विकेट्सच्या जवळ
बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ८० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ७७ डावांमध्ये ९९ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग (१०५ विकेट्स) पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराह १०० विकेट्स पूर्ण केल्यास, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरेल.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
१०५ – अर्शदीप सिंग
९९ – जसप्रीत बुमराह
९८ – हार्दिक पंड्या
९६ – युजवेंद्र चहल
९० – भुवनेश्वर कुमार
बुमराहचे संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग होता, मात्र त्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. आता टी-२० मालिकेद्वारे तो पुन्हा मैदानात परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती, त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांसाठी संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सनदर
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, सेंट ट्रिब्स, लुथॉब्स आणि सेंट ट्रिब्स.
हे देखील वाचा: IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार